गाझा, जेरुसलेम : इस्रायलने गाझाच्या वेढा दिलेल्या भागावरील हल्ले आणखी तीव्र केले असून त्यामध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. तर, इस्रायलच्या लढाऊ विमानांनी २४ तासांच्या कालावधीत हमासशी संबंधित ४५० ठिकाणांवर हल्ला केला आणि त्यांची काही जागा ताब्यात घेतली अशी माहिती इस्रायलच्या लष्कराने सोमवारी दिली.

हेही वाचा >>> राज्यपालांनी आत्मपरीक्षण करावे; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी, निष्क्रियतेवर कठोर ताशेरे

sensex again at the level of 74 thousand print eco news
तेजीवाल्यांची पकड मजबूत; सेन्सेक्स पुन्हा ७४ हजारांच्या उंबरठ्यावर
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
pilots missing What happened to Vistara
३८ हून अधिक उड्डाणे रद्द, तासभराचा उशीर, वैमानिक गायब; ‘विस्तारा’चं काय बिनसलं?
12 different products in maharastra received gi tags
तुळजापूरच्या कवड्याच्या माळेसह कोणत्या उत्पादनांना मिळाले जीआय मानांकन? जाणून घ्या सविस्तर…

दरम्यान, या युद्धामध्ये आतापर्यंत १० हजारांपेक्षा जास्त पॅलेस्टिनींचा मृत्यू झाल्याची माहिती तेथील आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आली. त्यामध्ये ४,००० पेक्षा जास्त लहान मुलांचा समावेश आहे. हमासची भुयारे, दहशतवादी, लष्करी परिसर, टेहेळणी चौक्या, रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांचे लाँच-पॅड यांच्यावर हल्ले केल्याचे इस्रायलने सांगितले. इस्रायलच्या फौजा मंगळवापर्यंत गाझा शहरात प्रवेश करण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी सोमवारी तुर्कीचे परराष्टमंत्री हकाम फिदान यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांचा पश्चिम आशियाचा दौरा सोमवारी समाप्त झाला. जीवितहानी रोखण्याबरोबरच या युद्धाची व्याप्ती इतर शेजारी देशांमध्ये वाढणार नाही याची खबरदारी घेण्याच्या दृष्टीने त्यांनी विविध नेत्यांबरोबर चर्चा केली.