अकाल तख्ताचे प्रमुख गुरबचन सिंग यांचे दिवाळीनिमित्त होणारे पारंपरिक भाषण बुधवारी कट्टरपंथींयांच्या आंदोलनामुळे बारगळले. इतकेच नव्हे तर कट्टरवाद्यांनी नेमलेले अकाल तख्ताचे समांतर जथेदार धियाँसिंग मांड यांनीच भाषण करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना सुवर्ण मंदिरातून अटक करण्यात आली. अनेक कट्टरपंथी कार्यकर्त्यांचीही धरपकड झाली आहे.  बिआंत सिंग हत्येतील जगतार सिंग हावरा याची कट्टरपंथीयांनी समांतर जथेदार म्हणून नेमणूक जाहीर केली आहे. हावरा तुरुंगात असल्याने मांड यांच्या हाती सूत्रे देण्यात आली आहेत.  या घडामोडींमुळे अमृतसरमध्ये तणावाचे वातावरण आहे.