वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे भाजपाचे उमेदवार साक्षी महाराज उन्नावमधून तब्बल चार लाख मतांनी विजयी झाले आहेत. पहिल्या फेरीपासून त्यांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत वाढतच गेली. ५७ टक्के मते मिळवून साक्षी महाराजांनी आपलाच विक्रम मोडला.

२०१४ लोकसभा निवडणुकीत साक्षी महाराज ४३.०९ टक्के मते मिळवून विजयी झाले होते. काँग्रेसच्या उमेदवार अनू टंडन यांच्याकडून साक्षी महाराजांना कडवी टक्कर मिळेल अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात प्रतिस्पर्धी उमेदवार साक्षी महाराजांच्या जवळपासही पोहोचू शकले नाहीत.

साक्षी महाराज वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. आपल्या वक्तव्यावरुन अनेकदा त्यांनी नरेंद्र मोदी सरकारला अडचणीत आणले होते.