विविध सरकारी योजनांमधील कोटय़वधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना झारखंड उच्च न्यायालयाने तात्पुरत्या स्वरूपाचा जामीन मंजूर केला आहे. आजारी असलेल्या आईला भेटण्यासाठी सदर जामीन देण्यात आल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे.
कोडा यांच्या जामीन अर्जावर न्या. एच. सी. मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी तुरुंगातून मुक्त केल्यापासून आठ दिवसांच्या आत कनिष्ठ न्यायालयासमोर हजर होण्याच्या अटीवर हा तात्पुरत्या स्वरूपाचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.