मध्यप्रदेशमध्ये महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करत जमावाने एका व्यक्तीला निर्घृणपणे मारहाण केली. ही घटना खंडवा जिल्ह्यात घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सहा आरोपींना अटक केली आहे. जमावाकडून संबंधित आरोपीला मारहाण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

नेमकं काय घडलं?

व्हायरल व्हिडीओत दिसत आहे की, सहा जणांचा जमाव एका मॉलच्या पार्किंगमध्ये एका व्यक्तीला निर्घृणपणे मारहाण करत आहे. सुरुवातीला जमावातील लोकांनी संबंधित व्यक्तीला आमच्या प्रश्नांची उत्तरं दे म्हणत धमकावलं. त्यानंतर जमावाने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर जमावातील काही लोकांनी या व्यक्तीला रुममध्ये ओढून आणलं आणि दोन व्यक्तींनी रॉडने मारहाण केली.

1195 minor girls missing from Nagpur in three years
नागपूर : उपराजधानीतून तीन वर्षांत ११९५ अल्पवयीन मुली बेपत्ता
11th class, seats vacant,
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात जागा रिक्त राहिल्याचे उघडकीस, झाले काय?
several injured in multiple stabbing-shooting incident
सिडनीतल्या मॉलमध्ये चाकू हल्ला, चार जणांचा मृत्यू, अनेक लोक जखमी; संशियाताला पोलिसांनी ठार केल्याचं वृत्त
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा

व्हिडीओ पाहा :

ही घटना ३ जानेवारीला घडली. त्याच दिवशी याबाबत तक्रारही दाखल करण्यात आली. मात्र, असं असतानाही दोन आठवडे आरोपींवर कारवाई झाली नाही. यानंतर मुस्लीम समुदायाचं एक प्रतिनिधी मंडळ जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटले. अखेर हा मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली.

हेही वाचा : दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांचाच विनयभंग, स्वतः ट्विट करत दिली माहिती; म्हणाल्या, “कारने फरपट नेलं अन्…”

खांडव्यातील काझी सय्यद निसार अली यांनी मुलगा मुस्लीम असल्याने त्याच्याविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप केला. दुसरीकडे पोलिसांनी मारहाण झाली त्या युवकाविरोधातही तरुणीची छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.