scorecardresearch

Premium

तोंडात बोळा कोंबून वडिलांचा अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार, पत्नीच्या मृत्यूनंतर १५ दिवसांतच…

एका नराधमाने पोटच्या लेकीवर अत्याचाराचा कळस गाठला आहे.

Minor girl Rape in car in nagpur
प्रातिनिधिक छायाचित्र

राजस्थानमधील चुरू येथील एका व्यक्तीने आपल्या अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढंच नव्हे तर नराधमाने पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिला गर्भनिरोधक गोळ्या खाऊ घालून तिचा गर्भपात केला आहे. पीडित मुलीने आपल्या मामाला याची माहिती दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोक्सो (बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील आहे. पीडितेने २१ ऑगस्ट रोजी घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या मामाला सांगितला. त्यानंतर मामाने आरोपी मेहुण्याविरुद्ध तक्रार दाखल केली.

farmer family performed last rites of ox
चंद्रपूर : पशू नव्हे कुटुंबातील सदस्यच! लाडक्या ‘लखन’च्या मृत्यूनंतर बळीराजाकडून तेरावी; बैलाच्या मृत्यूने शेतकरी कुटुंब…
Marco Troper death
यूट्यूबच्या माजी सीईओंच्या मुलाचा वसतीगृहात आढळला मृतदेह, कारण अद्याप अस्पष्ट
nashik assaulted accused sentenced in jail woman denied marriage
नाशिक : युवतीवर प्राणघातक हल्ला, आरोपीला पाच वर्ष तुरुंगवास
Video: 25-Year-Old Agra Man Dies Of Heart Attack While Working In Sweet Shop
मिठाईच्या दुकानात काम करताना कोसळला; २५ वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक, हृदयद्रावक मृत्यू कॅमेऱ्यात कैद

हेही वाचा- आधी गोड बोलले, जेवू घातलं मग फसवलं; प्रियकराला मारहाण करत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

पत्नीच्या मृत्यूनंतर मुलीला बनवलं वासनेची शिकार

‘झी राजस्थान’ने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित मुलीच्या आईचं २०२० मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. तेव्हापासून ती वडील आणि भावासोबत राहत होती. तिच्या आईच्या मृत्यूनंतरच तिच्या वडिलांनी तिच्यावर बलात्कार करण्यास सुरुवात केली. याला विरोध केला असता वडिलांनी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडितेने वडिलांकडून सुरू असलेल्या अत्याचाराबद्दल कुणालाही सांगितलं नाही.

हेही वाचा- मुंबईत दोन सावत्र मुलांसह नवऱ्याकडून महिलेवर गँगरेप, अत्याचाराचे VIDEO पॉर्न साइटवर केले अपलोड

पीडितेनं सांगितलं की, तिच्या आईच्या मृत्यूनंतर १५ दिवसांतच वडिलांनी तिच्यावर बलात्कार करायला सुरुवात केली. यादरम्यान ती गरोदर राहिली. त्यानंतर वडिलांनी तिला गर्भनिरोधक गोळ्या दिल्या आणि तिचा गर्भपात केला. २० ऑगस्ट रोजी वडिलांकडून बलात्कार होत असताना पीडितेच्या भावाने हा सर्व प्रकार पाहिला. यानंतर वडिलांनी मुलाला बेदम मारहाण केली आणि घरातून हाकलून दिले. पीडितेचा भाऊ आता आपल्या मामाकडे राहत आहे. पीडितेनं पुढे सांगितले की, तिचा भाऊ मामाच्या घरी निघून गेल्यावर आरोपी वडिलांनी तिला मारहाण केली आणि तोंडात बोळा कोंबून बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man raped minor daughter many times after wife death crime in rajasthan churu rmm

First published on: 04-09-2023 at 19:28 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×