ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसीचे माजी प्रमुख मार्क थॉमसन यांनी ‘द न्यूयॉर्क टाईम्स कंपनी’ची सूत्रे हाती घेतली. एकीकडे बीबीसीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असतानाच मार्क यांनी ही सूत्रे हाती घेतल्याने आता, अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाईम्सलाही नव्या आव्हानांचा सामना करावा लागेल की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.अमेरिकेतील प्रसिद्ध अशा न्यूयॉर्क कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मार्क थॉमसन यांची ऑगस्टमध्ये निवड झाली होती. बीबीसीचे एक प्रमुख जिमी सॅव्हिल यांनी केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा अहवाल दडवून ठेवण्यामध्ये सहभाग असल्याचा आरोप मार्क यांच्यावर होता. मार्क यांनी अनेकदा हा आरोप फेटाळला असला तरीही यामुळे त्यांच्या निवडीबाबत अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या होत्या.नव्या पदाची सूत्रे हाती घेताना बीबीसी ही जगातील नामांकित संस्था असून त्यांच्या कार्यक्षमतेवर उपरोक्त प्रकरणाचा कोणताही विपरीत परीणाम होणार नाहीच शिवाय आपणही ही नवी जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडू असा विश्वास मार्क थॉमसन यांनी व्यक्त केला.