नोकिया ग्राहकांना  विम्याची सुविधा
नव्या हॅण्डसेटच्या खरेदीवरच लाभ
मोबाइलभक्तांसाठी नोकियाने खुषखबर आणली आहे. तुमचा मोबाइल चोरीला गेला, लुटला गेला, हिंसक कारवाईत तो तुटला-फुटला किंवा अन्य काही कारणांनी त्याचे नुकसान झाले तर त्याला विमाछत्र लाभणार आहे. नोकिया आणि न्यू इंडिया अ‍ॅशुरन्स यांच्या संयुक्त विद्यमाने हे विमाछत्र नोकिया ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून नोकियाचा नवा मोबाइल हॅण्डसेट घेणाऱ्या ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
असे असेल विमाछत्र
* नोकियाचा नवा हॅण्डसेट घेणाऱ्या ग्राहकाला ५० रुपये किंवा हॅण्डसेटच्या एकूण किमतीच्या सव्वा टक्के एवढी रक्कम विम्याचा प्रीमियम म्हणून भरावी लागेल
* मोबाइलचे नुकसान झाले किंवा चोरीला गेला तर विमा कंपनी विम्याच्या दाव्यावेळी दहा टक्के घसारा आकारून परतावा देईल
* पहिल्या तीन ते सहा महिन्यांसाठी घसारा २५ टक्के असेल
* सहा ते १२ महिन्यांसाठी घसारा
५० टक्के असेल
* विमाछत्र १२ महिन्यांसाठी उपलब्ध असेल
यासाठी विमा लागू नाही : परदेशात असताना मोबाइल चोरीला गेला, ग्राहक मोबाइल कुठेतरी विसरला, इतर कोणतेही साधे कारण.
यासाठी विमा लागू : मोबाइल चोरीला गेला, पाण्यात पडला किंवा त्यात इतर कोणतेही द्रव्यपदार्थ शिरून खराब झाला.
दाव्यासाठी प्रक्रिया : ४८ तासांच्या आत पोलिसांत तक्रार, विमा कंपनीलाही कळवावे लागेल, एफआयआरची सक्ती नाही.