जौनपूर : लोकसभा निवडणूक देशासाठी एक मजबूत सरकार चालवू शकेल असा नेता निवडण्याची संधी आहे. भारताच्या सामर्थ्याची जगाला जाणीव करून देणारा पंतप्रधान निवडा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे केले. जौनपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार कृपाशंकर सिंह आणि मछली शहर (राखीव) मतदारसंघातील बी. पी. सरोज यांच्या प्रचरार्थ जौनपूर महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित प्रचार सभेत मोदी बोलत होते.

हेही वाचा >>> कोणताही ‘अपवाद’ नाही! केजरीवाल यांच्या जामिनाबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

Kolkata Rape and Murder Accused Sujoy Roy
Sunjoy Roy : कोलकाता प्रकरणातील आरोपी संजय रॉयला हवं चाओमिन, तुरुंगातली पोळी-भाजी पाहून संताप, म्हणाला..
LPG Gas Cylinder Price
LPG Gas Cylinder Price : गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ; आता किती रुपयांना मिळणार सिलिंडर?
foreign Minister S Jaishankar
भारताच्या दृष्टीने चीन ही विशेष समस्या! परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे मत
adhir ranjan chowdhury mamata banerjee
Kolkata Rape Murder : “कोलकाता हत्याकांडातील पीडितेचं कुटुंब नजकैदेत”, काँग्रेसचे ममता बॅनर्जी सरकारच्या कारभारावर ताशेरे
Haryana Mob Lynching
Haryana Mob Lynching : गोमांस खाल्ल्याच्या संशयातून बेदम मारहाण करत मजुराची हत्या; एकजण गंभीर, सात आरोपी गजाआड
Accident News
Video Viral News : चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रक तब्बल २० फूट खाली टँकरवर पडला; अपघाताचा थरारक व्हिडीओ व्हायरल
Election Commission of India
Haryana Assembly Election: मोठी बातमी! हरियाणा विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निकाल; कोणाला होणार लाभ?
Kerala film industry News
Kerala Film Industry : “आम्हाला सेक्स वर्कर्सप्रमाणे का वागवलं जातं?”, केरळ सिनेसृष्टीत काम करणाऱ्या महिलांनी सांगितली आपबिती
Crime News
Crime News : गोमांस खाल्ल्याच्या संशयावरुन मजुराची मारहाण करुन हत्या, गोरक्षा समितीच्या पाच सदस्यांना अटक

‘‘ही निवडणूक म्हणजे देशाचा पंतप्रधान निवडण्याची संधी आहे. जो एक मजबूत सरकार चालवू शकतो असा पंतप्रधान निवडा. ज्यावर जगाचे वर्चस्व असू शकत नाही. परंतु जगाला भारताच्या सामर्थ्याची तो जाणीव करून देऊ शकेल, असे पंतप्रधानांनी सांगितले. जेव्हा तुम्ही कृपाशंकर सिंह यांना जौनपूरमधून, सरोज यांना मछली शहरमधून मतदान करता, तेव्हा तुमच्या मताने एक मजबूत सरकार बनेल. त्यांना दिलेली मते थेट मोदींच्या खात्यात जमा होतील, असे पंतप्रधान म्हणाले. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत (सीएए) काँग्रेस आणि समाजवादी पक्षाकडून असत्य माहिती पसरवली जात आहे, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला.