तेलाच्या वाढत्या आयातीला पायबंद घालण्याचा उपाय म्हणून देशभरातील पेट्रोलपंप रात्री बंद ठेवण्याच्या प्रस्तावावर सरकार विचार करीत आहे. केंद्रीय पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली यांनी रविवारी यासंबंधी बंगळुरूत सूतोवाच केले. तेलाची आयात कमी करण्यासाठी विचारार्थ असलेल्या अनेक पर्यायांमध्ये रात्री पेट्रोलपंप बंद करण्याचा पर्यायही  असल्याचे मोईली म्हणाले. १६ हजार कोटी रुपये वाचविण्यासाठी तेल मंत्रालय १६ सप्टेंबरपासून मोहीम सुरू करणार आहे.