पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून आज जनतेशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी भारताचे दिवंगत महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या आठवणींना उजाळा दिला. यासोबत पंतप्रधान मोदींनी करोनावरील लसीची भीती दूर करण्यासाठी गावकऱ्यांसोबत संवाद साधत नागरिकांना लस घेण्याचं आवाहन केलं. पंतप्रधान मोदींनी माझ्या आईने आणि मी लसीचे दोन्ही डोस घेतले असल्याचे सांगितले. त्यामुळे आपण ही लस घ्या असे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींनी एका दिवसातील जास्तीत जास्त लसीकरणाच्या विक्रमाबद्दल यावेळी चर्चा केली. दरम्यान उत्तर प्रदेशातील भीमपूर जिल्ह्यातील गावकऱ्यासोबत चर्चा करताना त्यांनी लसीकरणाबाबत विचारले. गावकऱ्यांनी लस न घेतल्या कळल्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, माझ्या आईने आणि मी लसीचे दोन्ही डोस घेतले असल्याचे सांगितले. त्यामुळे आपण ही लस घ्या असे म्हणत त्यांनी न घाबरण्याचे आवाहन केले.

Mann Ki Baat : पंतप्रधान मोदींनी दिला मिल्खा सिंग यांच्या आठवणींना उजाळा, म्हणाले…

पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रमामध्ये लसीकरणाबाबत गावातील लोकांसोबत संवाद साधला. उत्तर प्रदेशातील भीमपूर जिल्ह्यातील दुलारिया गावातील व्यक्तीसोबत लसीकरणाबाबत चर्चा केली. त्यावेळी गावातील काही लोकांनी, व्हॉट्सअॅपवर काही खोटेनाटे पसरवले त्यामुळे लोक गोंधळात पडले असल्याचे सांगितले.

पंतप्रधानांनी “जर मनात भीती असेल तर ती काढून टाका. संपूर्ण देशातील ३१ कोटींपेक्षा जास्त लोकांनी लस टोचून घेतली आहे. मी स्वत: देखील दोन्ही डोस घेतले आहेत. माझी आई तर जवळजवळ १०० वर्षांची आहे. तिनेसुद्धा दोन्ही डोस घेतले आहेत. कधीकधी एखाद्याला ताप वगैरे येतो, परंतु हे अगदी किरकोळ आहे, काही तासांसाठीच होते. लस न घेणे खूप धोकादायक ठरू शकते. यामुळे तुम्ही स्वत:लाच केवळ धोक्यात टाकता असे नाही तर, तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आणि गावाला धोक्यात टाकता. लवकरात लवकर लस घ्या आणि गावातील प्रत्येकाला सांगा की भारत सरकार विनामूल्य लसीकरण करत आहे आणि १८ वर्षांच्या वरील सर्व लोकांसाठी हे विनामूल्य लसीकरण आहे,” असे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या मन की बात कार्यक्रमाच्या सुरूवातीस, देशवासीयांना उद्देशून ऑलिम्पिकशी संबंधित काही प्रश्न विचारले, तसेच भारताचे दिवंगत महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या आठवणींना उजाळा दिला. मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रम वेगळ्या प्रकारे सुरुवात केली. टोकियो ऑलम्पिकच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काही प्रश्न विचारले. पंतप्रधान मोदींनी विचारले की ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारे पहिले भारतीय कोण? कोणत्या खेळात भारताने आतापर्यंत सर्वाधिक पदके जिंकली आहेत, कोणत्या खेळाडूने सर्वाधिक पदके जिंकली आहेत? असे काही प्रश्न त्यांनी विचारले.