भारतीय चलनातील १०० रुपयापेक्षा जास्त रक्कमेच्या सर्व नोटांवर नेपाळमध्ये बंदी घालण्यात आली आहे. नेपाळ सरकारच्या या निर्णयाचा पर्यटकांना मोठा फटका बसणार आहे. नेपाळमध्ये भारतीय चलन मोठया प्रमाणात वापरले जाते. नेपाळी नागरिक आणि व्यावसायिक रोजच्या दैनंदिन व्यवहारासाठी भारतीय चलन मोठया प्रमाणावर वापरतात. १०० रुपयापेक्षा जास्त रक्कमेच्या भारतीय नोटा जवळ बाळगू नका किंवा व्यवहारासाठी वापरु नका. १०० रुपयाच्या पुढच्या नोटांना कायदेशीर मान्यता नाही असे नेपाळचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री गोकुळ प्रसाद बासकोटा यांनी सांगितले.

नेपाळमध्ये भारतीय चलन स्वीकारले जात असले तरी भारतात नोटाबंदी होण्याआधी सुद्धा नेपाळमध्ये ५०० आणि १ हजारच्या नोटेने व्यवहार करताना अडचणी येत होत्या. नेपाळ सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे भारतीय पर्यटकांच्या अडचणी वाढल्या आहेत. भारतातून मोठया संख्येने पर्यटक नेपाळमध्ये जात असतात.

Finance Ministry report predicts a comforting dip in inflation amid forecasted monsoon rains
महागाईत दिलासादायी उताराचा अंदाज; मोसमी पावसाच्या अनुमानाच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाचा अहवाल
Survey, Finds 58 percentage Indians, Suffer from Mosquito Bites, Affecting sleep, Affecting Productivity, Mosquito Bites, Indians Mosquito Bites, gcpl survey,
डासांमुळे निम्म्या भारतीयांची होतेय झोपमोड; महाराष्ट्रासह पश्चिम भारताला बसतोय सर्वाधिक फटका
Health insurance for all ages
आता कोणत्याही वयात आरोग्य विमा सुरक्षा खरेदी करता येणार, नेमका बदल काय?
indian air force
युद्ध, मदत व बचावकार्य या आघाड्यांवर भारतीय हवाई दल किती कार्यक्षम? ’गगन शक्ती २०२४‘ कवायतीने दिले उत्तर!

५०० आणि १ हजार रुपयाच्या बनावट नोटा मोठया प्रमाणात नेपाळमध्ये सापडल्या होत्या. नेपाळमधूनच या नोटा भारतात आणल्या जायच्या. त्यामुळे भारतीय नोटांवर बंदी घालण्याचे हे सुद्धा एक कारण असू शकते.

भारतात काम करणाऱ्या नेपाळी नागरिकांना आता डिजिटल पद्धतीने पैसे नेपाळला पाठवावे लागतील किंवा सर्व नोटा शंभर रुपयांच्या चलनामध्ये बदलून घ्याव्या लागतील. भारत हा नेपाळचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. भारतातून मोठया प्रमाणावर ग्राहकपयोगी वस्तू नेपाळला पाठवल्या जातात. २०१६ साली ५०० आणि १००० रुपयाच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर भारत सरकारने ५००, २००० आणि दोनशे रुपयाच्या नव्या नोटा आणल्या.