नेपाळ पोलिसांनी बुधवारी वादग्रस्त आध्यात्मिक गुरू ‘राम बहादुर बोमजन’ याला बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक केले. बोमजनचे अनुयायी त्याला बुद्धाचा अवतार मानतात आणि त्याला ‘बुद्ध बॉय’ टोपण नावाने ओळखतात. लहान असतानाच बोमजनला बरीच प्रसिद्धी मिळाली. बोमजनने आपल्या आश्रमातून भक्तांचे अपहरण आणि बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. नेपाळ पोलिसांच्या केंद्रीय तपास यंत्रणेने बोमजनला काठमांडू शहराच्या बाहेरील परिसरातील एका घरातून ताब्यात घेतले. बोमजनने आपल्या अल्पवयीन अनुयायांवर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.

पोलिसांनी बुधवारी बोमजनला बेड्या ठोकून माध्यमांसमोर आणले. यावेळी पोलिस दलाचे प्रवक्ते कुबेर कदायत यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून पोलिसांना गुंगारा दिल्यानंतर अखेर बोमजनला अटक करण्यात यश आले. सरलाही या जिल्ह्यातील एका आश्रमात अल्पवयीन भक्तावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, अटक करताना आरोपीकडून तीन कोटी नेपाळी रुपये आणि २२,५०० डॉलर्स जप्त करण्यात आले.

rod attack on st bus conductor marathi news
बारामतीमध्ये महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच आता नागपुरात एसटी वाहकावर रॉडने हल्ला…
Loksatta sanvidhanbhan Constitution Struggle for equality
संविधानभान: समतेसाठी संघर्षयात्रा
Rare Maldhok Bird Chick Born at Conservation Breeding Center in Rajasthan
गंभीर धोक्यातील माळढोकसाठी आशेचा किरण…. जैसलमेरच्या प्रजनन केंद्रात….
three workers died due to electric shock
अंबरनाथ: विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू, जांभूळ जल शुद्धीकरण केंद्रातील घटना

बोमजनवर गैरवर्तन आणि अत्याचार केल्याचे आरोप एक दशकाहून अधिक जुने आहेत. २०१० साली त्याने अनेकांना मारहाण केली होती, अशा तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. ध्यान करताना एकाग्रता भंग केली म्हणून ही मारहाण केली, असे बोमजनकडून सांगितले जात असे. २०१८ साली एका १८ वर्षीय ननवर बलात्कार केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे.

त्यानंतर २०१९ साली त्याच्या आश्रमातून चार अनुयायी बेपत्ता झाले. बेपत्ता अनुयायांच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी बोमजन विरोधात कारवाईचा फास आवळला. केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी दिनेश आचार्य यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, चारही अनुयायांचा अजूनही पत्ता लागलेला नाही. जोपर्यंत त्यांच्याबद्दलचे सत्य समोर येत नाही, तोपर्यंत त्यांची हत्या झाली, असे आम्ही मानत नाही.

दक्षिण नेपाळमध्ये बोमजन २००५ सालापासून प्रसिद्धीस आला होता. तो अनेक महिने अन्न किंवा पाणी न घेता ध्यान करतो, अशी लोकांची समज होती. त्याच्यावर अत्याचाराचे आरोप होऊनदेखील त्याच्या लोकप्रियतेमध्ये घट झाली नाही.