ग्रहांप्रमाणेच सूर्यमालेचाच सदस्य असलेले धूमकेतू हे नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. सूर्याच्या भोवती लंबवर्तुळाकार प्रवास करणारे अनेक धूमकेतू असून ते ठराविक कालवधीनंतर सूर्याला वळसा घालत असतात. यापैकी काहीच धूमकेतू हे आत्तापर्यंत माहित झाले असून अनेक धूमकेतू अज्ञात आहेत, काही धूमकेतूंचे अस्तित्व तर सूर्याच्या जवळ जातांनाच लक्षात येते. यापैकीच एक धूमकेतू म्हणजे C/2023 P1 Nishimura. हा धूमकेतू सध्या पृथ्वीपासून दूर आहे. असं असलं तरी पृथ्वी ज्या कक्षेत सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते ती कक्षा ओलांडत त्याने सूर्याजवळून जाण्यासाठी प्रवास सुरु केला आहे.

या धूमकेतूचा शोध जपानमधील हौशी खगोल अभ्यासक हिदेओ निशिमुरा यांनी काही दिवसांपूर्वीच म्हणजे ११ ऑगस्टला लावला. त्यांनी शोध लावला म्हणून त्यांच्या नावावरुन या धूमकेतूला C/2023 P1 Nishimura असे नाव आता देण्यात आले आहे. तेव्हा आता जगभरातून या नव्या धूमकेतू बद्दल निरिक्षणे सुरु झाली आहेत. याचा नेमका आकार अजुनही समजू शकलेला नाही. सूर्याच्या जवळ जात असल्याने उष्णतेमुळे या धूमकेतूच्या शेपटाचा पसारा आणखी वाढणार आहे.

heat waves, weather,
यंदाचा एप्रिल महिना उष्णतेच्या लाटांचा; पुढील पाच दिवस पारा आणखी वाढणार
meteor showers, sky, meteor,
उद्यापासून आकाशात उल्कावर्षावाचा विविधरंगी नजारा, सुमारे १२ हजार वर्षांनी…
Bhandara District Swelters as Temperature Hits 43 Degrees Celsius Early in April
उन्हाच्या झळा : भंडाऱ्याचा पारा ४३ अंशावर , एप्रिल महिन्यात प्रथमच एवढे तापमान
space
एप्रिलमध्ये अवकाशात अपूर्व मनमोहक घडामोडींची रेलचेल; वाचा नेमकं विशेष काय..?

सध्या खगोलीय दुर्बिणीतून हा धूमकेतू न्याहाळता येत आहे. येत्या ११ सप्टेंबरला तो पृथ्वीपासून सर्वात जवळच्या अंतरावर असेल आणि सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितीजावर हा धूमकेतू साध्या डोळ्यांनीही बघता येईल. त्यानंतर पुढील साधारण दोन दिवस त्याचे दर्शन होईल आणि मग दुर्बिणीतूनच त्याला बघता येईल.