मोठ्या अंतराळ मोहिमामध्ये लोकप्रिय व्यक्तींची नावं अंतराळात पाठवण्याचा ट्रेण्ड आता भारताकडूनही फॉलो केला जाणार आहे. खासगी क्षेत्रातील पहिला उपग्रह सतीश धवन सॅटलाइटसोबत (सएडी सॅट) भगवद्गीता, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आणि २५ हजार भारतीय लोकांची नावं अंतराळात पाठवली जाणार आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था असणाऱ्या नासाकडून यापूर्वी अशाप्रकारे अनेकदा लोकप्रिय व्यक्तींच्या नावांची यादी अंतराळात पाठवण्यात आली. भारताकडून पाठवण्यात येणाऱ्या २५ हजार नावांमध्ये बहुतांशी नावं ही विद्यार्थ्यांची असतील असं सांगण्यात येत आहे. इस्रो आपल्या विश्वसनीय अशा ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाने म्हणजेच पीएसएलव्ही सी-५१ ने इतर दोन खासगी उपग्रहांसोबत सएडी सॅट अवकाशात सोडणार आहे.

एसडी सॅटची निर्मिती करणाऱ्या चेन्नईमधील स्पेसकिड्स या कंपनीने तांत्रिक विभागाचे प्रमुख असणाऱ्या रिफत शाहरुख यांनी दिलेल्या माहितीनुसार साडेतीन किलो वजनाच्या या नॅनो उपग्रहामध्ये एक अतिरिक्त चिप लावण्यात आली असून त्यामध्येच ही नावं असणार आहे. या नॅनोसॅटेलाइटचे नाव भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे संस्थापक असणाऱ्या सतीश धवन यांचे नाव देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञानाची गोडी वाढावी या हेतूने हा उपग्रह अंतराळात पाठवण्यात येणार असल्याचे स्पेसकिड्सने स्पष्ट केलं आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत हा उपग्रह अंतराळात पाठवण्याचे निश्चित करण्यात आलं आहे.

आणखी वाचा- शाह यांची नेपाळ आणि श्रीलंकेतही सरकार स्थापन करण्याची योजना; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा दावा

स्पेसकिड्स इंडियाच्या संस्थापिका आणि कार्यकारी अध्यक्ष असणाऱ्या डॉ. श्रीमती केसन यांनी हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, या उपग्रहाच्या प्रक्षेपणासंदर्भात खूप उत्साह असल्याची माहिती दिली. अंतराळात जाणारा हा आमच्या कंपनीचा पाहिला उपग्रह असणार आहे. जेव्हा आम्ही या मोहिमेचा विचार केला तेव्हा आम्ही लोकांकडून या उपग्रहासोबत नाव पाठवण्याची इच्छा असणाऱ्यांनी आमच्याशी संपर्क करावा असं आवाहन केलं होतं. एका आठवड्यामध्ये आमच्याकडे २५ हजार भारतीयांनी नाव नोंदनी केली. यापैकी एक हजार नावं ही भारताबाहेर असणाऱ्या नागरिकांची आहे. चेन्नईमधील एका शाळेने ते शाळेतील सर्व मुलांची नावं पाठवली. अंतराळ विज्ञानासासंदर्भात मुलांमध्ये आवड निर्माण करण्याच्या हेतूने सर्वसामान्यांकडून नावं मागवण्यात आल्याचे केसन म्हणाल्या. ज्या लोकांची नावं अंतराळात पाठवण्यात येणार आहेत त्यांना विशेष बोर्डींग पासही दिला जाणार असल्याची माहिती केसन यांनी दिली.

आणखी वाचा- “भारत मूर्खपणाची रंगभूमी ठरतोय, जर २२ वर्षांची विद्यार्थिनी देशासाठी धोका ठरत असेल तर…”

केसन यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील अंतराळ मोहिमांप्रमाणे या मोहिमेमध्ये भगवद्गीतेची प्रत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव आणि फोटोही या उपग्रहाच्या पुढील पॅनलवर आत्मनिर्भर मोहिमेसोबत जोडून लावण्यात आलं आहे. हा उपग्रह पूर्णपणे भारतीय बनावटीचा आहे.