राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पकडून देणाऱ्यासाठी बक्षिसांची घोषणा केली आहे. दाऊदला पकडू देणाऱ्या व्यक्तीला एनआयएकडून २५ लाख रुपये बक्षीस दिलं जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. मुंबईमध्ये १९९३ साली झालेले साखळी बॉम्बस्फोटांबरोबरच शस्त्रास्त्रांची तस्करी, अमली पदार्थांची तस्करी, बनावट नोटा प्रकरण, दहशतवादी हल्ले अशा अनेक गुन्ह्यांमध्ये दाऊद हा आरोपी आहे. पाकिस्तानी यंत्रणांच्या मदतीने दहशतवादी हल्ले घडवून आणल्याचा आरोप दाऊदवर आहे. बुधवारी एनआयएने बक्षीस जाहीर केल्याची माहिती समोर आली आहे.

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार एनआयएच्या एका अधिकाऱ्याने गुप्ततेच्या अटीखाली दिलेल्या माहितीनुसार तपास यंत्रणांनी दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम ऊर्फ हजी अनीस, दाऊदचा जवळचा सहकारी जावेद पटेल ऊर्फ जावेद चिकना, शकील शेख ऊर्फ छोटा शकील यांच्यासोबतच इब्राहिम मुश्ताक अब्दुल रझाक मेमन ऊर्फ टायगर मेमन यांना पकडून देणाऱ्यांसाठीही बक्षिसांची घोषणा केली आहे. दाऊदला पकडून देणाऱ्याला २५ लाख, छोटा शकीलला पकडून देणाऱ्याला २० लाख तर अनीस, चिकना आणि मेननला पकडून देणाऱ्याल प्रत्येकी १५ लाख रुपये बक्षीस दिलं जाणार आहे.

Big fluctuations in the shares of two private sector banks in the capital market
बँकांच्या भागधारकांना अनोखी अनुभूती; कुणा वाट्याला आनंद, कुणा पदरी दुःख!
न्यायालयीन प्रक्रियेच्या दुरुपयोगासाठी जनहित याचिका नको; याचिकाकर्त्यांना ५० हजार रुपयांचा दंड
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप

दाऊद सध्या पाकिस्तानमधील कराचीत वास्तव्यास आहे. १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर दाऊदला पकडून देणाऱ्याला यापूर्वीच २५ मिलियन अमेरिकी डॉलर्स बक्षिस देण्याची घोषणा संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीकडून २००३ साली करण्यात आली आहे. भारतामधील मोस्ट वॉण्टेड आरोपींच्या यादीमध्ये दाऊदचं नाव आहे. लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हफीस सईद, जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझर, हिजबुल मुजाहिद्दीनचा संस्थापक सैयद सलाहुद्दीन आणि त्याचा जवळचा सहकारी अब्दुल रौफ असगर या मोस्ट वॉण्टेड आरोपींच्या यादीत दाऊदचाही समावेश आहे.

एनआयएने दाऊद आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात फेब्रुवारी महिन्यात नव्याने गुन्हा दाखल केला आहे. दाऊदच्या डी कंपनीने भारतामधील दहशतवादी कारवायांना मदत करण्यासाठी विशेष तुकडी स्थापन केल्याची माहिती समोर आल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या मदतीने भारतात दहशतवादी कारवाया घडवण्यासाठी दाऊद काम करत असल्याचे समजते. देशातील प्रमुख नेते, उद्योजकांना लक्ष्य करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, अल कायदासारख्या दहशतवादी संघटनांच्या स्लीपर सेल्सच्या मदतीने दहशथतवादी कारवाया घडवण्याचा पाकिस्तानचा कट आहे.

एनआयएने मिळालेल्या माहितीच्या आधारे २९ ठिकाणांवर छापेमारी केली. हजी अली आणि माहीम दर्गाचे ट्रस्टी सुहाली खंडवाणी, १९९३ साली मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरलेला समिर हिंगोरा, छोटा शकीलचा नातेवाईक सलीम कुरेशी ऊर्फ सलीम फ्रूट, दाऊद इब्राहिमचा नातेवाईक इक्बाल कास्कर, भिवंडीमधील कयाम शेख यांच्या ठिकाणांवर मे महिन्यात एनआयएकडून छापेमारी करण्यात आली होती.