नवी दिल्ली : अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासावर या वर्षी झालेल्या हल्ल्याच्या तपासासंदर्भात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बुधवारी पंजाब आणि हरियाणामधील १४ ठिकाणी छापे टाकले. ‘एनआयए’च्या प्रवक्त्याने ही माहिती देताना सांगितले, की १९ मार्च आणि २ जुलै रोजी अमेरिकेत झालेल्या हल्ल्यांमागील संपूर्ण कट उघड करण्यासाठी दोन्ही राज्यांत छापे टाकण्यात आले.

हेही वाचा >>> खलिस्तानवादी पन्नूच्या हत्येचा कट अमेरिकेने उधळला; भारताला जूनमध्ये इशारा देण्यात आल्याचा दावा

Loksatta anvyarth Anti Israel Rage at American Universities
अन्वयार्थ: अमेरिकी विद्यापीठांत इस्रायलविरोधी रोष
us report on manipur
“मणिपूरमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन”, अमेरिकेने भारत सरकारला दाखवला आरसा; बीबीसीवरील छापेमारीसह राहुल गांधींचाही उल्लेख
Attack on Israel by terrorist groups
इराणच्या नेतृत्वात हिजबुल्ला, हुथी अन् पॅलेस्टिनी दहशतवादी गट एकत्र; इस्रायल हल्ले कसे रोखणार?
Israel use of AI in war revealed in reports by Israeli and Palestinian journalists
इस्रायलकडून युद्धात ‘एआय’चा वापर? इस्रायली आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या अहवालात खुलासा

वाणिज्य दूतावासात अवैध प्रवेश, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, दूतावासातील अधिकाऱ्यांना इजा आणि इमारतीत जाळपोळीसारख्या गुन्ह्यांसंदर्भात ही यंत्रणा तपास करत आहे. ‘एनआयए’ने पंजाबमधील मोगा, जालंधर, लुधियाना, गुरुदासपूर, मोहाली आणि पतियाळा येथे तर हरियाणातील कुरुक्षेत्र आणि यमुनानगर जिल्ह्यात छापे टाकले. प्रवक्त्याने सांगितले की, कारवाईदरम्यान आरोपींशी संबंधित माहिती असलेला ‘डिजिटल डेटा’ जप्त करण्यात आला. या शिवाय अन्य आक्षेपार्ह कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.

हेही वाचा >>> मणिपूरला जायला वेळ नाही, सामना बघायला आहे; प्रियंका गांधींची टीका

योग्य संदेश देण्यासाठी.. ‘एनआयए’च्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, वाणिज्य दूतावासावर हल्ला करणाऱ्यांवर खटला चालववून अशा भारतविरोधी घटकांवर कठोर कारवाईचा संबंधितांना योग्य संदेश देण्यासाठी ‘एनआयए’ या प्रकरणाचा तपास करत आहे. ‘एनआयए’च्या पथकाने ऑगस्ट २०२३ मध्ये सॅन फ्रान्सिस्कोला भेट देऊन वाणिज्य दूतावासावरील हल्ल्यांच्या घटनांची चौकशी केली होती. या वर्षी २ जुलै रोजी सॅनफ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासावर खलिस्तान समर्थकांनी हल्ला केला होता. फुटीरतावादी ‘खलिस्तान टायगर फोर्स’चे प्रमुख हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येनंतर हा हल्ला झाला. याआधी १९ मार्च रोजी खलिस्तान समर्थक आंदोलकांच्या एका गटाने वाणिज्य दूतावासावर हल्ला करून त्याची तोडफोड केली होती.