तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर ‘कॅश-फॉर-क्वेरी’ अर्थात लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी एका उद्योगपतींकडून पैसे आणि भेटवस्तू घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी हा आरोप केला असून या प्रकरणाची चौकशी होत नाही तोवर मोईत्रा यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करावं, अशी मागणीदेखील त्यांनी त्यांनी केली आहे. याप्रकरणी मोईत्रा यांची नीतिमत्ता समितीकडून चौकशी करण्यात आली. दरम्यान, आता सीबीआय म्हणजेच केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभाग या प्रकरणाचा तपास करणार आहे.

लोकपालांनी सीबीआयला चौकशीचे आदेश दिले आहेत, असा दावा भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे. निशिकांत दुबे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, माझ्या तक्रारीनंतर लोकपालांनी सीबीआयला चौकशीचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा गहाण ठेवून मोईत्रा यांनी भ्रष्टाचार केल्याप्रकरणी लोकपालांनी त्यांच्या चोकशीचे आदेश दिले आहेत.

Inadequate Public Relations, Misconduct to office bearers , lead to cut the ticket, Mumbai bjp members of parliament, gopal Shetty, Poonam Mahajan, manoj kotak, lok sabha 2024, north Mumbai lok sabha seat, Mumbai north central lok sabha seat, north east Mumbai lok sabha seat, marathi news, bjp Mumbai, Mumbai news,
जनता व कार्यकर्त्यांशी उद्धट वर्तन मुंबईतील भाजपच्या तिन्ही खासदारांना भोवले
Kiran Mane on Ujjwal Nikam
“दोन पक्षांवर दरोडे पडले तेव्हा हा भामटा…”, किरण मानेंची उज्ज्वल निकम यांच्यावर टीकात्मक पोस्ट
Dindori lok sabha election 2024, Communist Party of India (Marxist), jiva pandu gavit
दिंडोरीत कार्यकर्त्यांच्या दबावामुळे माकप उमेदवार उभा करणार
rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?

निशिकांत दुबे यांनी आधी मोईत्रा यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी मोईत्रा यांची तक्रारही केली. दुबे यांनी लोकपाल, लोकसभा अध्यक्ष आणि माहिती आणि तंत्रज्ञान मंत्र्यांकडे मोईत्रा यांची तक्रार केली. दुबे यांनी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव तसेच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना दोन वेगवेगळी पत्रे लिहिली. अश्विनी वैष्णव यांना लिहिलेल्या पत्रात दुबे यांनी मोईत्रा यांच्या लोकसभेच्या लॉग इनसाठीच्या आयपी अ‍ॅड्रेसची तपासणी करावी. मोईत्रा यांच्या लोकसभेच्या लॉगइन आयडी आणि पासवर्डचा वापर अन्य कोणी करत आहे का? हे तपासावे, अशी मागणी केली.

खासदार दुबे यांनी ओम बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात मोईत्रा यांनी हिरानंदानी समूहाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी लाच घेतली, असा आरोप केला. तसेच या आरोपांची चौकशी होईपर्यंत मोईत्रा यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणीही त्यांनी केली. त्यापाठोपाठ दुबे यांनी लोकपालांकडे सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

हे ही वाचा >> विश्लेषण : हजरजबाबी तरी वादग्रस्त; महुआ मोईत्रांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू! संसदेत प्रश्न विचारणे का ठरतेय चर्चेत?

मोईत्रा यांच्यावर आरोप काय?

निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांच्यावर अनेक आरोप केले आहेत की संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात हिरानंदानी यांनी महुआ मोईत्रा यांना रोख रक्कम आणि भेटवस्तू दिल्या होत्या. तसेच दर्शन हिरानंदानी यांनी २०१९ ची निवडणूक लढण्यासाठी मोईत्रा यांना ७५ लाख रुपये दिले होते. त्याचबरोबर मोईत्रा यांना महागडे आयफोनही दिले होते. महुआ मोईत्रा यांना देण्यात आलेल्या सरकारी बंगल्याची डागडुजीदेखील हिरानंदानी यांनीच केली होती, असे अनेक दावे दुबे यांनी केले आहेत.