उत्तर प्रदेशचा पूर्व भाग तसेच पश्चिमेकडे शुक्रवारी हलका ते मुसळधार पाऊस पडल्याचे वृत्त असून बिहारची राजधानी पाटण्यालाही पावसाने झोडपून काढल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरात गेल्या २४ तासांत ११ सेंटीमीटर पाऊस पडला असून शनिवारीही राज्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.पाऊस झाल्यामुळे राज्यातील तापमान सरासरीपेक्षा सात अंशांनी खाली आल्याचे सांगण्यात आले. पाटणा शहराच्या अनेक भागांत पाणी साठले असून या पाण्याचा निचरा करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे साहाय्य मागविण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशातही गेल्या २४ तासांत महाराजगंज (१३ सेमी), काकराही व बिलासपूर येथे प्रत्येकी (११ सेमी), बन्सी (१० सेमी), गोरखपूर (७ सेमी) पावसाची नोंद झाली.