उत्तर कोरियाचे सर्वसत्ताधीश हुकुमशाह किम जोंग उन त्यांच्या अनेक गोष्टींसाठी कायमच चर्चेत असतात. कधी ते विशेष रेल्वेनं थेट रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भेटण्यासाठी दाखल होतात, तर कधी आपल्या सैन्याला अचानक युद्धासाठी सज्ज व्हायचे आदेश देतात. कधी त्यांच्या मृत्यूच्या चर्चा सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालतात, तर कधी युद्धसामग्रीतल्या काहीशे गोळ्यांसाठी एक आख्खं शहर ते बंद करतात. आता किम जोंग उन एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहेत. आपल्या लहरी आणि सर्वशक्तीशाली वृत्तीमुळे नेहमीच प्रचंड आक्रमक असणारे किम जोंग उन अचानक भर कार्यक्रमात रडू लागल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

किम जोंग उन यांनी काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियात पार पडलेल्या राष्ट्रीय माता परिषदेला प्रमुख उपस्थिती लावली होती. गेल्या ११ वर्षांत पहिल्यांदाच उत्तर कोरियामध्ये अशा प्रकारची परिषद झाल्याचं दिसून आलं. या परिषदेमध्ये किम जोंग उन यांनी देशातील जन्मदराबाबत चिंता व्यक्त केली. गेल्या काही वर्षांत सातत्याने घटणाऱ्या जन्मदराचं आव्हान मोठं असून त्याचा सामना करण्यासाठी देशातल्या मातांनी अधिकाधिक मुलांना जन्माला घालावं, अशी अजब विनंती किम जोंग उन यांनी या परिषदेत केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या भाषणानंतर उपस्थित महिलांच्या डोळ्यांतही अश्रू उभे राहिले होते.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

काय म्हणाले किम जोंग उन?

किम जोंग उन यांनी देशातील घटत्या जन्मदरावर चिंता व्यक्त केली. “जेव्हा सर्व मातांना हे समजेल की अधिकाधिक मुलांना जन्माला घालणं ही देशभक्ती आहे आणि त्या हे सगळं मोठ्या सकारात्मकतेनं करतील, तेव्हा एक समर्थ समाजवादी देश निर्माण करण्याचं आपलं ध्येय अधिकाधिक वेगाने पूर्ण होईल”, असं किम जोंग उन यांनी यावेळी म्हटलं.

“देशातल्या महिलांनी सतर्क माता, उत्तम पत्नी आणि दयाळू सुना होण्याचा प्रयत्न करायला हवा. जोपर्यंत एक महिला समाजवादी होत नाही, तोपर्यंत तिला तिच्या मुलांना किंवा मुलींना समाजवादी बनवता येणं अशक्य आहे. अशा परिस्थितीत त्या महिलेला तिच्या कुटुंबातील सदस्यांना क्रांतिकारी बनवणं निव्वळ अशक्य होऊन बसतं”, असंही किम जोंग उन यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

अधिक मुलं, अधिक लाभ

दरम्यान, किम जोंग उन यांनी अधिक मुलं जन्माला घालणाऱ्या कुटुंबांसाठी राष्ट्रीय योजनांचा अधिक लाभ देण्याची तयारी दर्शवली आहे. “अनेक मुलं असणाऱ्या कुटुंबांना गृहनिर्माण, अन्नपुरवठा व आरोग्य सुविधांमध्ये प्राधान्य दिलं जाईल. त्याव्यतिरिक्त अशा महिलांना अनुदान व उपचारांमध्ये प्राधान्य दिलं जाईल”, असं किम जोंग उन यांनी नमूद केलं आहे.

किम जोंग-उनचा नवा कारनामा; ६५३ गोळ्यांसाठी अख्खं शहरच बंद केलं! दारोदार हिंडतायत कोरियन सैनिक!

उत्तर कोरियात जन्मदराची स्थिती काय?

संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्याविषयक अहवालातील माहितीनुसार, उत्तर कोरियामध्ये एका महिलेला तिच्या संपूर्ण आयुष्यात होणाऱ्या मुलांचं प्रमाण सरासरी १.८ इतकं आहे. देशातील महिलांची एकूण संख्या व तिथे जन्मलेल्या मुलांची एकूण संख्या यांच्या गुणोत्तरावरून हे प्रमाण काढण्यात आलं आहे. गेल्या काही दशकांमध्ये हे प्रमाण कमालीचं खालावल्याचं दिसून आलं आहे.

१९७०-८० च्या दशकापर्यंत उत्तर कोरियाचा जन्मदर जास्त होता. मात्र, या दशकांमध्ये देशात जन्मदर नियंत्रण उपाययोजना मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आल्या. तसेच, ९०च्या दशकात उत्तर कोरियामध्ये मोठ्या प्रमाणावर कुपोषणाची समस्या निर्माण झाली. त्यामुळे देशात जन्मदराचं प्रमाण प्रचंड खालावलं. सध्या देशाची लोकसंख्या अडीच कोटी आहे.

Story img Loader