World Largest Electric Vehicle Hub in India: इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Ola इलेक्ट्रिक भारतातील तामिळनाडू राज्यामध्ये एक ईव्ही हब स्थापन करणार आहे. ज्यामध्ये चांगल्या क्वालिटीचे सेल, ईव्ही तयार करण्याच्या सुविधा आणि डीलर – सप्लायर असतील. ओला इलेक्ट्रिक कंपनीने शनिवारी याबद्दल माहिती दिली आहे. ईव्ही हब हे एकाच ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांसाठी सर्वात मोठे सपोर्टींग इकोसिस्टीम बनेल असे कंपनीचे म्हणणे आहे.

Ola चे सीईओ भाविश अग्रवाल म्हणाले की, आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील २५ वर्षे भारतात अमृत काळाच्या रूपात पाहिली आहेत. मला ठाम विश्वास आहे की हे दशक आमचे आहे आणि आम्हाला आमचे भविष्य घडवण्याची मोठी संधी आहे. ईव्हीसाठी जागतिक केंद्र बनण्याच्या दृष्टीने आम्ही योग्य मार्गावर आहोत. ओलचे ईव्ही हब संपूर्ण ईव्ही इकोसिस्टीमला एका छताखाली आणेल. ज्यामध्ये आम्ही टू-व्हिलर , फोर-व्हिलर आणि सेलमध्ये एक मजबूत वर्टिकल इंटिग्रेटेड मोबिलिटी कंपनी होईल असे त्यांनी कंपनीच्या निवेदनामध्ये म्हटले आहे. ओला त्याच्या आगामी ईव्ही हबमधून मोठ्या प्रमाणात सेलचे उत्पादन सुरु करेल.

international monetary fund praises india for maintaining fiscal discipline in election year
निवडणूक वर्षातही भारताकडून वित्तीय शिस्त कायम; आंतरराष्ट्रीय़ नाणेनिधीकडून कौतुक; आघाडीच्या देशांमध्ये स्थान कायम राहणार
Nagpur, Jyoti Amge, World's Shortest Woman, World's Shortest Woman voting, World's Shortest Woman in nagpur, lok sabha 2024, polling day, nagpur news, guinness book
जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेचे नागपुरात मतदान
World's youngest billionaire List By Forbes
१९ वर्षीय तरुणी ठरली जगातील सर्वात तरुण अब्जाधीश, किती आहे संपत्ती? भारतात हा मान कुणाला मिळाला, हे ही पाहा
Next gen Maruti Suzuki Dzire
मारुतीचा नाद करायचा नाय! देशात आणतेय ‘ही’ नवी हायब्रिड कार, कधी होणार भारतात दाखल?

हेही वाचा : Tech Layoff मध्ये TCS च्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; नोकरी तर जाणार नाहीच पण…

गेल्या वर्षी Ola ने लिथियम आयन सेल NMC-2170 चे लॉन्चिंग केले होते. हे त्यांच्या बंगळुरू येथील अत्याधुनिक बॅटरी इनोव्हेशन सेंटरमध्ये तयार करण्यात आले होते. यामध्ये ५०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक झाली होती.

Ola इलेक्ट्रिकने तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या उपस्थितीमध्ये सरकारसोबत सामंजस्य करार केला. ओला राज्यामध्ये ७,६१४ कोटी रुपयांची गुतंवणूक करणार आहे. या प्लांटमध्ये इलेक्ट्रिक कार आणि लिथियम आयन सेल तयार करणार आहे. ओलाच्या या गुंतवणुकीमुळे राज्यात ३,१११ नोकऱ्या निर्माण होणार आहेत.

हेही वाचा : Smartphones Under 8000: पैसे वसूल करणारे पाच स्मार्टफोन; देणार ‘हे’ जबरदस्त फीचर्स, किंमत ८ हजारांहून कमी

हा प्रकल्पामध्ये तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातील SIPCOT बारगुर मध्ये 20GW बॅटरी उत्पादन क्षमतेचा एक इलेक्ट्रिक फोर व्हिलर आणि EV सेल प्लांटचा समावेश आहे. प्रस्तावित चारचाकी वाहन प्रकल्प २०० एकरावर सुरु करण्यात येणार आहे. सेल प्लांट हा १०० एकर तर , सध्या असलेला टू-व्हिलर प्लांट हा ५०० एकरवर आहे. ओलाने २०२४ पर्यंत एकदा चार्ज केले की सुमारे ५०० किमीच्या रेंजसह आपली फोर-व्हिलर ईव्ही सुरु करण्याची योजना तयार केली आहे.