पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालली असल्याची परिस्थिती आहे. पाकिस्तानची नॅशनल एअरलाईन्स गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानची नॅशनल एअरलाईन्स (पीआयए) अनेक अडचणींचा सामना करत आहे. कर्जाच्या डोंगरामुळे ही कंपनी डबघाईला आली असून खासगीकरणाच्या वाटेवर आहे. आता पाकिस्तान सरकार या इंटरनॅशनल एअरलाईन्समधील बहुसंख्य शेअर्स विकण्याच्या विचारात आहे.

पाकिस्तान नॅशनल एअरलाईन्सवर गेल्या अनेक दिवसांपासून कर्जाचा डोंगर वाढत आहे. त्यामुळे सरकार या एअरलाईन्सचे खासगीकर करण्याच्या तयारीत आहे. ‘एआरवाय न्यूज’ने दिलेल्या एका वृत्तानुसार, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्समधील आर्थिक नुकसान पाहता एअरलाईन्समधील बहुसंख्य शेअर्स सरकार विकणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Kirit Somaiya shinde fadnavis
“या सरकारमध्येही घोटाळा होणार होता, पण…”, सोमय्यांचा शिंदे-फडणवीसांना घरचा आहेर; भाजपावरही आरोप
rahul gandhi sanjay nirupam
“काँग्रेसने त्यांची उरलीसुरली ऊर्जा…”, संजय निरुपमांचा घरचा आहेर; म्हणाले, “माझ्यावर स्टेशनरी खर्च करू नका, मी उद्या…”
K C Venugopal came to have a seat at the Congress high table
कसे झाले वेणुगोपाल काँग्रेसमधील सत्ताकेंद्र? काँग्रेस नेत्यांच्या आऊटगोइंगला का ठरताहेत कारणीभूत?
rajnath singh on pakistan
‘घरात घुसून मारू’, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या आक्रमक भूमिकेनंतर पाकिस्तानचा जळफळाट

हेही वाचा : “दहशतवादी पाकिस्तानात पळाले तर त्यांना घरात घुसून ठार करू”; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांचं वक्तव्य

पाकिस्तान सरकारच्या अर्थव्यवस्था आणि ऊर्जा विभागाचे समन्वयक बिलाल अझर कयानी यांनी याबाबत भाष्य केले आहे. कयानी यांच्या म्हणण्यानुसार, ‘पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे प्रशासकीय नियंत्रण हे बहुसंख्य शेअर्स घेणाऱ्या संस्थेकडे हस्तांतरीत केले जाईल. अनेक जागतिक कंपन्यांनी ही एअरलाईन्स खरेदी करण्याबाबत स्वारस्य व्यक्त केले आहे’, असे ते म्हणाले.

विमानांची उड्डाणे रद्द करण्याची वेळ

काही महिन्यांपूर्वी पाकिस्तान नॅशनल एअरलाईन्समधील विमानांची उड्डाणे इंधनाच्या कमतरतेमुळे रद्द करण्याची वेळ पाकिस्तानवर आली होती. या एअरलाईन्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे इंधनाची कमतरता जाणवल्यामुळे विमान कंपनीवर ही नामुष्की ओढवली होती. यानंतर आता या कंपनीचे खासगीकरण होण्याची शक्यता आहे.