पाकिस्तानातील सिंध आणि बलुचिस्तान प्रांतातील काही शहरांना शनिवारी ६.८ रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाचे धक्के बसले. पाकिस्तानच्या भूगर्भशास्त्र विभागाने हे धक्के ७.२ रिश्टर स्केल क्षमतेचे असल्याचे म्हटले आहे. राजधानीची शहरे असलेल्या कराची आणि क्वेट्टाला धक्के बसल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच कराचीमध्ये आपापल्या कार्यालयातून कर्मचारी तातडीने बाहेर पडत असल्याचे चित्रण अनेक वाहिन्यांवरून दाखविण्यात आले. दोन दिवसांपूर्वी भूकंपाचा धक्का बसला तितकी या धक्क्यांची तीव्रता नव्हती, तरीही टेबल-खुर्चीला हादरे बसल्याचे स्पष्टपणे जाणवत होते, असे मीडिया समूहाच्या अदनान अहमद यांनी सांगितले.