घराला आग लागली असताना आपल्या किशोरवयीन मालकाचे प्राण वाचवताना पोपटाने बलिदान केल्याची घटना ब्रिटनमधील दक्षिण वेल्स परगण्यातील लानेली येथे घडली आहे. मालकासाठी प्राणार्पण करणाऱ्या या पोपटाचे नाव ‘कुकी’ असे आहे. लानेली येथील घरात बेन रीस हा किशोरवयीन मुलगा एकटा राहत होता, त्याच्या शयनगृहात ही आग लागली होती. आग लागल्यानंतर या कुकी नावाच्या पोपटाने खूप कलकलाट करून मालकाला म्हणजे त्या किशोरवयीन मुलाला सावध केले, नंतर या मुलाने स्वत:ची सुटका करून घेऊन सुरक्षा रक्षकांना पाचारण केले. पण कुकी मात्र सुटका करून घेऊ शकला नाही. तो या आगीत मरण पावला. बेन हा त्या घरात एकटाच राहत होता व तो शॉवर घ्यायला गेला होता. दरम्यान शयनगृहात लावलेल्या उदबत्तीच्या ठिणग्या इतरत्र पसरून आग लावली तेव्हा या पोपटाने कलकलाट करून बेनला सावध केले. त्याने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले पण ती विझवता आली नाही. नंतर तो घरातून पळून गेला. त्याला अग्निशमनदलांनी ऑक्सिजन दिला व उपचारही केले. नंतर अग्निशामक जवानांनी आग आटोक्यात आणली पण कुकी नावाचा पोपट मात्र यात मृत्युमुखी पडला. त्याचे घराच्याच बागेत दफन करण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 12th Feb 2013 रोजी प्रकाशित
मालकाचे प्राण वाचवताना पोपटाचे प्राणार्पण
घराला आग लागली असताना आपल्या किशोरवयीन मालकाचे प्राण वाचवताना पोपटाने बलिदान केल्याची घटना ब्रिटनमधील दक्षिण वेल्स परगण्यातील लानेली येथे घडली आहे. मालकासाठी प्राणार्पण करणाऱ्या या पोपटाचे नाव ‘कुकी’ असे आहे.
First published on: 12-02-2013 at 04:17 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parrot lost the life for saveing his owners life