गेल्या चार दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी मुंबईमध्ये पेट्रोल ३४ पैशांनी महागले असून प्रति लिटर ७८.७३ रूपये झाले आहे. डिझेलच्या दरातही वाढ झाली असून मुंबईत डिझेल प्रति लिटर ६९.५३ रूपये झाले आहे. राजधानी दिल्लीमध्येही पेट्रोलच्या दरांत वाढ झाली आहे.

दिल्लीमध्ये शुक्रावारी पेट्रोल ३५ पैशांनी वाढून प्रति लिटर ७३.०६ रूपये झाले आहे. तर डिझेल २८ पैशांनी वाढून ६६.२९ रूपये झाले आहे. सौदी अराम्कोकडून होणाऱ्या खनिज तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. मुंबईमध्ये मंगळवार, बुधवार आणि गुरूवारी अनुक्रमे प्रति लिटर १४, २५ आणि २९ पैशांनी पेट्रोल महागलं होते. तर डिझेल प्रतिलिटर १५, २४ आणि १९ रूपयांनी महागलं होते.

(महाराष्ट्रतील विविध शहरांत असलेले शुक्रवारचे पेट्रोलचे दर)

इंडियन ऑयलच्या वेबसाईटनुसार, दिल्ली, कोलकता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलच्या दर वधारून प्रति लिटर ७३.०६ रुपये, ७५.७७ रुपये, ७८.७३ रुपये आणि ७५.९३ रुपये झाले आहेत.  पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे..

(महाराष्ट्रतील विविध शहरांत असलेले शुक्रवारचे डिझेलचे दर )