काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर राहुल गांधींनी पक्षाला नवी उभारी देण्यासाठी अपार मेहनत केली. त्याचमुळे आता भाजपाविरोधात काँग्रेसला चांगलं यश मिळालं अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी दिली आहे. यूपीएच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांचं कौतुक केलं आहे.

छत्तीसगढमध्ये काँग्रेसला ९० पैकी ५४ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर मध्यप्रदेशात २३० जागांपैकी १११ जागांवर काँग्रेसने आघाडी घेतली आहे. राजस्थानातील १९९ जागांपैकी ८७ जागांवर काँग्रेसने आघाडी घेतली आहे. हे सगळं यश राहुल गांधींच्या अपार मेहनतीमुळे पक्षाला मिळालं आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सोनिया गांधी यांनी राहुल गांधींचं कौतुक केलं आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हे मोदी सरकारसाठी धक्कादायक आहेत. अजून संपूर्ण निकाल लागायचे आहेत. तरीही जे कल आणि आघाड्या हाती येत आहेत त्यावरून काँग्रेसने बाजी मारलेली दिसते आहे. अशात आता राहुल गांधी यांनी पक्षासाठी अपार मेहनत घेतली आणि म्हणून काँग्रेसला हे यश मिळाले असे म्हणत सोनिया गांधी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.