प्रियकरानेच केला विश्वासघात, मित्रांसह मिळून प्रेयसीवर केला सामूहिक बलात्कार

प्रियकराने मित्रांसोबत मिळून सामूहिक बलात्कार केल्यानंतर अल्पवयीन मुलीने किटकनाशके पिऊन आत्महत्या केली.

प्रतिनिधिक छायाचित्र

प्रियकराने मित्रांसोबत मिळून सामूहिक बलात्कार केल्यानंतर अल्पवयीन मुलीने किटकनाशके पिऊन आत्महत्या केली. मागच्या शनिवारी २४ ऑगस्ट रोजी बंगलाच्या पूर्व मिदनापोर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. कोलकात्याच्या एसएसकेएम या सरकारी रुग्णालयात मुलीचा मृत्यू झाला. प्रियकरानेच विश्वासघात केल्यानंतर पीडित तरुणीने विष प्राशन करुन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.

रुग्णालयात असताना तिची प्रकृती बिघडत गेली अखेर गुरुवारी रात्री तिचा मृत्यू झाला. प्रियकराने २४ ऑगस्टला पीडित मुलीला घरातून बोलवून बाहेर आणले व तिला जवळच्या शेतात घेऊन गेला. तिथे त्याने व त्याच्या मित्रांनी मिळून पीडित तरुणीवर  सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर हादरुन गेलेल्या पीडित मुलीने विष प्राशन करुन जीवन संपवले.

आरोपींनी या घटनेचा व्हिडिओ बनवला होता. याबद्दल कुठेही वाच्यता केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती असा आरोप मृत मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत सहापैकी चार आरोपींना अटक केली आहे. एका अल्पवयीन आरोपीचाही यामध्ये समावेश आहे. तिघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Raped by boyfriend and his friends girl kills self dmp

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या