scorecardresearch

Premium

रेवंत रेड्डी यांचा शपथविधी; व्यासपीठावर ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती, लालबहादूर शास्त्री स्टेडियमवर समर्थकांची गर्दी

प्रमुख काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत रेवंत रेड्डी यांनी तेलंगणच्या मुख्यमंत्रीपदाची गुरुवारी शपथ घेतली.

Revanth Reddy took oath as Chief Minister of Telangana on Thursday in the presence of leading Congress leaders
(हैदराबादमध्ये रेवंत रेड्डी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी उपस्थित होते.)

पीटीआय, हैदराबाद

प्रमुख काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत रेवंत रेड्डी यांनी तेलंगणच्या मुख्यमंत्रीपदाची गुरुवारी शपथ घेतली. राज्यपाल तमिळसाई सौंदरराजन यांनी रेड्डी तसेच मंत्रीमंडळातील इतर सहकाऱ्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. येथील एल.बी.स्टेडियमवर हा भव्य सोहळा झाला.

Vinod Tawde Nitish Kumar
राजकीय गदारोळात विनोद तावडे बिहारमध्ये दाखल, भाजपा नितीश कुमारांना समर्थन देणार?
ajit pawar latest news in marathi, parth pawar gajanan marne marathi news
गुंड गजानन मारणे, पार्थ पवार भेटीवर अजित पवार म्हणाले, “अतिशय चुकीची…”
CM EKnath SHinde in Farm
हाती घेतले फावडे अन् ट्रॅक्टरही चालवला; शेतीकामात रमलेल्या मुख्यमंत्र्यांच्या ओठी शांता शेळकेंच्या ‘या’ ओळी!
babasaheb patil asurlekar elected ajit pawar ncp kolhapur district president
कोल्हापूर राष्ट्रवादीत धक्कादायकघडामोडी; जिल्हाध्यक्षपदावरून ए. वाय. पाटील यांचा पत्ता कट,आसुर्लेकर नूतन अध्यक्ष

मल्लू भट्टी विक्रमरका यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर मंत्री म्हणून एन.उत्तमकुमार रेड्डी, कौमित्र वेंकट रेड्डी, सी.दोमदर राजनरसिंहा, डी.श्रीधर बालू, पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी, पोन्नम प्रभाकर, कोंडा सुरेखा, डी. अनुसया, टी. नागेश्वर राव आणि जुपली कृष्णराव यांनी शपथ घेतली. या सोहळय़ाला सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री शिवकुमार, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखिवदर सुख्खू उपस्थित होते.प्रगती भवन या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान तसेच कार्यालयाचे नामकरण ज्योतीराव फुले प्रजा भवन असे करण्यात येईल.

तातडीने निर्णय : शपथ घेतल्यानंतर रेड्डी यांनी दोन फाईलवर स्वाक्षरी केली. यामध्ये काँग्रेसने सहा हमी दिली आहे त्या आश्वासनाचा समावेश आहे. तर अपंग महिलांना नोकरी देण्याच्या आश्वासनाची पूर्ती रेड्डी यांनी घेतली.

हेही वाचा >>>महुआ मोईत्रांच्या बडतर्फीचा अहवाल आज लोकसभेत? खासदारांसाठी भाजपचा व्हीप जारी

कुशल संघटक : २०१७-१८ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ मध्ये मलकगिरी मतदारसंघातून त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली. २०२१मध्ये पक्ष प्रदेशाध्यक्षपदाची धुरा आल्यावर राज्यातील पक्ष नेत्यांची एकजूट करत त्यांनी केवळ दोन वर्षांत काँग्रेसला राज्यात सत्ता मिळवून दिली.

अभाविप ते मुख्यमंत्रीपद

रेवंत रेड्डी यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकीय कार्याला सुरुवात केली. अर्थात या संघटनेत ते फार काळ नव्हते. २००७ मध्ये आंध्र प्रदेश विधानसभेवर अपक्ष म्हणून विजयी झाले. त्यानंतर तेलुगू देसम पक्षात त्यांनी प्रवेश केला. तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख झाली. २००९ तसेच २०१४ मध्ये तेलुगू देसम पक्षाकडून ते विधानसभेवर विजयी झाले. २०१५ मध्ये त्यांच्यावर विधान परिषद निवडणुकीत तेलुगू देसमला मत देण्यासाठी लाच घेतल्याचे आरोप झाले. त्यांना हैदराबाद कारागृहात ठेवण्यात आले. काही काळ ते सक्रीय नव्हते. त्यानंतर त्यांनी २०१७-१८ मध्ये तेलुगू देसम पक्षाचा राजीनामा दिला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Revanth reddy took oath as chief minister of telangana on thursday in the presence of leading congress leaders amy

First published on: 08-12-2023 at 04:20 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×