अमेरिकेचे भारतातील राजदूत म्हणून रिचर्ड राहुल वर्मा (४७) यांचा शपथविधी पार पडला. परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी त्यांना अधिकारपद व गुप्ततेची शपथ दिली.
वर्मा यांनी भारत-अमेरिका अणुकरार व भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यात मोठी भूमिका पार पाडली आहे.
वर्मा हे पुढील महिन्यात केरी यांच्या भेटीच्या वेळी  नवी दिल्ली येथे येत आहेत त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचा दौरा सुरू होत आहे. सिनेट यांनी वर्मा यांच्या नावावर गेल्या आठवडय़ात आवाजी मतदानाने शिक्कामोर्तब केले होते.