भारतीय वंशाच्या शिक्षणतज्ज्ञाची नेमणूक अमेरिकी अध्यक्षांचे जागतिक उद्योजकता दूत म्हणून करण्यात आली असून, अमेरिकेच्या पुढील पिढीला ते उद्योजकतेचे धडे देणार आहेत. नियुक्ती करण्यात आलेल्या भारतीय वंशाच्या व्यक्तीचे नाव सलमान खान असे असून त्यांची आई कोलकात्याची तर वडील बांगलादेशचे आहेत.
   जागतिक उद्योजकता क्षेत्रात अध्यक्षांचे दूत म्हणून ते काम करतील. प्रेसिडेन्शियल अ‍ॅम्बेसेडर्स फॉर ग्लोबल आंत्रप्रेन्युअरशिप (पेज) या संस्थेची बैठक अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या नेतृत्वाखाली काल झाली. यशस्वी अमेरिकी उद्योजकांचा हा गट असून पुढील पिढीतील उद्योजकांना मार्गदर्शन करणे हे त्याचे काम आहे. खान यांनी गणित व विज्ञान शिकवण्यासाठी किमान ४८०० व्हिडिओ पाठ तयार केलेले आहेत.