सियाचीन परिसरात जोरदार हिमवृष्टी होत असून रविवारी सकाळी हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत भारतीय लष्कराचे सहा जवान ठार झाले. एक जवान बेपत्ता असल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.सियाचीन भागातील हनीफ क्षेत्रात आसाम रेजिमेंटच्या जवानांना तैनात करण्यात आले होते. सकाळी सातच्या सुमारास हे सैनिक एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असताना हिमकडा कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत सहा जवान ठार झाले. तर एकजण अद्याप बेपत्ता आहे. दरम्यान, हिमालयातील अतिशय उंचीवर असलेल्या सियाचीनमध्ये भारत आणि पाकिस्तानने आपापले लष्कर तैनात केलेले आहे. हा प्रदेश लष्करमुक्त ठेवण्याचे प्रयत्न केले गेले. मात्र पाकिस्तानकडून  प्रतिसाद मिळालेला नाही.