प्रियंका गांधींसमोर नरेंद्र मोदींच्या नावे घोषणाबाजी, काँग्रेस-भाजपा कार्यकर्ता भिडले

प्रियंका गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ वाराणसीत पोहोचल्या होत्या

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी तीन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर असून बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ वाराणसीत पोहोचल्या. यावेळी अस्सी घाट येथे ‘सांची बात..प्रियंका के साथ’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात काही काँग्रेस कार्यकर्ते ‘मोदी चोर है’ अशी घोषणाबाजी करत होते.

मुलाखती सुरु असताना अपर्णा नावाच्या एका विद्यार्थिनीलादेखील ही घोषणा देण्यास सांगण्यात आलं. विद्यार्थिनीने विरोध केला असता तिच्याशी असभ्य वर्तन करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी विद्यार्थिनीला मारहाण केली. यावेळी प्रियंका गांधींसमोरच नरेंद्र मोदींच्या नावे घोषणाबाजी करण्यात आली.

प्रियंका गांधी या तीन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर असून सोमवारी त्यांनी प्रयागराज येथून दौऱ्याला सुरुवात केली होती. दुसऱ्या दिवशी त्या मिर्झापूर येथे गेल्या होत्या. तर बुधवारी शेवटच्या दिवशी त्या वाराणसीत पोहोचल्या. मोदींच्या मतदारसंघात प्रियंका गांधी पहिल्यांदाच पोहोचल्या होत्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Supporters chant modi modi infront of priyanka gandhi