परदेश दौऱयांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱया काँग्रेसजनांचा आणि राहुल गांधींचा समाचार घेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरूवारी राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणे आणि सहलीसाठी देशाबाहेर जाणे यात फरक असल्याचा टोमणा मारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा दोन किंवा तीन दिवसांसाठी परदेश दौऱयावर जात असतात तेव्हा ते राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत असतात याची जाणीव काँग्रेसमधील माझ्या मित्राला असेलच. पण, राष्ट्रीय कर्तव्य निभावण्यासाठी देशाबाहेर जाणे आणि सहलीसाठी जाणे या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. त्यामुळे या दोघांतील फरक तूम्ही समजून घ्यायला हवा, असा अरुण जेटली यांनी राहुल यांना नाव न घेता अप्रत्यक्ष टोला लगावला. तसेच राहुल यांच्या सूट बूट की सरकार या टीकेवर जेटली यांनी देशातील सरकार ‘सूज बूज की सरकार’ असल्याचे प्रत्युत्तर दिले.