दिल्ली सरकारवर नियंत्रण आणण्याच्या अध्यादेशाविरोधात विरोधकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नेत्यांची भेटी-गाठी घेत आहेत. शनिवारी ( २७ मे ) केजरीवाल यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ( केसीआर ) यांची हैदराबाद येथे भेट घेतली. यावेळी केसीआर यांनी केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा दर्शवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केसीआर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. “पंतप्रधान मोदींनी अध्यादेश मागे घ्यावा, अशी आमची मागणी आहे. देशात आणीबाणीपेक्षाही वाईट परिस्थिती आहे. जनतेने निवडून दिलेल्या सरकारला तुम्ही ( केंद्र सरकार ) काम करून देत नाही,” असा आरोपही केसीआर यांनी केला.

हेही वाचा : धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचं पाकिस्तानलाही हिंदू राष्ट्र करण्याबाबत मोठं विधान; म्हणाले, “गुजरातचे लोक…”

“हा जनतेच्या जनादेशाचा अपमान आहे”

“आम्ही नरेंद्र मोदींना अध्यादेश मागे घेण्याची मागणी करतो. आमचा अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा आहे. मोदी सरकारने दिल्लीतील नागरिकांचा अपमान केला आहे. हा जनतेच्या जनादेशाचा अपमान आहे. केंद्राने अध्यादेश मागे घ्यावा, अन्यथा आम्ही एकजुटीने लढा देऊ,” असं केसीआर यांनी म्हटलं.

“८ वर्षानंतर दिल्लीतील लोकांना न्याय मिळाला होता”

अरविंद केजरीवाल यांनीही मोदी सरकारवर टीका केली आहे. “८ वर्षे दिल्लीतील लोकांना अपंग करून ठेवलं. ८ वर्ष लढाई लढल्यानंतर ११ मेला सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने लोकांच्या हक्काचा निर्णय दिला. त्यामुळे दिल्लीतील लोकांना न्याय मिळाला होता. पण, ८ दिवसांच्या आताच केंद्र सरकारने अध्यादेश आणून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलला,” असा हल्लाबोल केजरीवाल यांनी केला.

हेही वाचा : VIDEO: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील निती आयोगाच्या बैठकीला ‘हे’ १० मुख्यमंत्री गैरहजर, म्हणाले…

“…तर न्यायासाठी लोकांनी कोणाकडं जायचं”

“देशाचे पंतप्रधानच सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मानत नाहीत. तसेच, अध्यादेश आणून निर्णय बदलतात. तर, न्यायासाठी लोकांनी कोणाकडं जायचं. देश कसा चालणार? हे चुकीचं आहे,” असं केजरीवाल म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This time is worse than the days of emergency say telangana cm kcr after meet arvind kejriwal ssa
First published on: 27-05-2023 at 20:53 IST