भारतात बिझनेस करणे झाले सोपे, क्रमवारीत २३ स्थानांची सुधारणा


भारतात व्यवसाय करणे आता अधिक सोपे बनले आहे. व्यवसाय करण्यासाठी अनुकूल वातावरण असलेल्या देशांच्या यादीत भारताच्या क्रमावारीत मोठी सुधारणा झाली आहे. जागतिक बँकेने बुधवारी यासंबंधीचा महत्वाचा अहवाल जाहीर केला. भारताने व्यवसाय सुलभ देशांच्या यादीत १०० व्या स्थानावरुन थेट ७७ व्या स्थानी झेप घेतली आहे. म्हणजे भारताच्या क्रमवारीत २३ स्थानांची सुधारणा झाली आहे….वाचा सविस्तर

पेट्रोल १६ पैशांनी स्वस्त, डिझेलचे दर जैसे थे


पेट्रोलचे प्रति लिटर दर मुंबईत १६ पैशांनी तर दिल्लीत १८ पैशांनी कमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळते आहे. अशात डिझेलचे दर जैसे थे ठेवत पेट्रोल १६ पैशांनी स्वस्त झाले आहे….वाचा सविस्तर

‘भरीव मदतीच्या तरतुदीशिवाय दुष्काळ जाहीर करणे ही फसवणूकच’


कोणत्याही भरीव मदतीशिवाय राज्य सरकारने जाहीर केलेला दुष्काळ ही शेतकऱ्यांची मोठी फसवणूक असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. राज्य सरकारने १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर केल्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना ते बोलत होते...वाचा सविस्तर

सचिन-विनोद पुन्हा मैदानात, आशीर्वादासाठी आचरेकर सरांकडे


क्रिकेटचा देव अशी ओळख असलेला खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे दोघेही टीम इंडियासाठी उत्तम खेळ केलेले खेळाडू. एक काळ असा होता की या दोघांची जोडी हिट ठरली होती. मात्र अनेक वादांमुळे विनोद कांबळीला क्रिकेटचे मैदान सोडावे लागले. मात्र हीच जोडी पुन्हा एकदा मैदानावर उतरते आहे…वाचा सविस्तर

२५ पैसे भरपाई मागत राखी सावंतचा तनुश्रीविरोधात मानहानीचा दावा


२५ पैशांची नुकसान भरपाई मागत ड्रामा क्वीन राखी सावंतने तनुश्री दत्ताविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. #MeToo या मोहिमेत तनुश्री दत्ताने ‘हॉर्न ओके प्लीज’ च्या सेटवर अभिनेते नाना पाटेकर यांनी लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. मात्र तनुश्री दत्ताचे हे आरोप खोटे आहेत असं म्हणत राखी सावंतने तिच्यावर टीका केली आहे….वाचा सविस्तर