पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायलमध्ये मागील २२ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. ७ ऑक्टोबर रोजी हमासने गाझापट्टीवर रॉकेट हल्ला केला होता, त्यानंतर युद्धाला तोंड फुटलं. गेल्या काही दिवसांत इस्रायलने गाझा पट्टीवर बॉम्बवर्षाव केला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत ७ हजाराहून अधिक लोक मारले गेले आहेत. अद्याप इस्रायलकडून गाझापट्टीवर हल्ले सुरूच आहेत. दरम्यान, इस्रायलने गाझामध्ये हमास संघटनेकडून तयार केलेल्या बोगद्यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. हमासचा नाश करायचा असेल तर गाझामधील भूमिगत बोगदे पाडले पाहिजे, असंही इस्रायलच्या संरक्षण दलाकडून म्हटलं आहे.

इस्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) ‘एक्स’वर (पूर्वीचं ट्विटर) लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, गाझामधील रुग्णालये, शाळा, मशिदी आणि घरांच्या खाली हमास दहशतवादाचे एक भयानक अंडरवर्ल्ड आहे. हमासचा नाश करायचा असेल तर त्यांचे भूमिगत बोगदे पाडले पाहिजेत.

हेही वाचा- VIDEO: “माझं संपूर्ण कुटुंब संपलं, आता मी कशी जगू”, आईचा मृतदेह पाहताच गाझातील मुलीचा आक्रोश

संबंधित व्हिडीओत आयडीएफने म्हटलं, “हमासचे दहशतवादी कुठे लपतात? रॉकेट्सचा साठा कुठे ठेवला जातो? हमासचं मुख्यालय कुठे आहे? याचा तुम्ही कधी विचार केलाय का? गाझा शहरातील रस्त्यांच्या खाली जमिनीत हमासने भूमिगत शहर तयार केलं आहे. ते एक जटिल चक्रव्यूह आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हमासचे दहशतवादी येथे राहत आहेत.”

हेही वाचा- Israel-Hamas War: गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या इस्रायली तरुणीचा ‘तो’ VIDEO हमासकडून जारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“या बोगद्यांमधून अगदी सहजपणे हत्यारं गाझातील वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवले जातात. हमासच्या नेत्यांनी इस्रायलवर हल्ला करण्यासाठी नियोजनपूर्वक पद्धतीने हे बोगदे तयार केले आहेत. हमासने आपल्या दहशतवाद्यांचं रक्षण करण्यासाठी मशीद, रुग्णालये आणि गाझामधील लाखो लोकांचा ढाल म्हणून वापर केला आहे,” असंही आयडीएफने व्हिडीओत म्हटलं.