सध्या डिजिटल पेमेंट करण्याचे प्रमाण देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेआहे. प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन स्वरूपात पेमेंट करता येत असल्यामुळे cash जवळ बाळगण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे. आपण ऑनलाईन व्यवहारांसाठी UPI वापरत असाल तर ही तुमच्यासाठी खूप महत्वाची बातमी समोर आली आहे. १ एप्रिलपासून UPI ​​व्यवहार महाग होणार आहेत. तुम्ही २,००० रुपयांपेक्षा जास्त पैसे भरल्यास तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. याबाबत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने एक परिपत्रक जारी केले आहे.

हेही वाचा : चॅटजीपीटीमुळे ‘या’ क्षेत्रातील लोकांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड? OpenAI चे सीईओ म्हणाले, “जी लोकं…”

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने अलीकडेच एक परिपत्रक जारी केले आहे ज्यात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ला व्यापारी व्यवहारांवर प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPI) शुल्क लागू करण्यास सांगितले आहे. परिपत्रकानुसार २,००० रुपयांपेक्षा जास्त UPI व्यवहारांवर १.१ टक्के शुल्क भरावे लागेल. हे शुल्क वापरकर्त्याला व्यापारी व्यवहारांसाठी भरावे लागणार आहे.

बिझनेस स्टँडर्ड’च्या अहवालानुसार प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPI) च्या UPI पेमेंटवर १.१ शुल्क आकारले जाणार आहे. पीपीआयमध्ये वॉलेट किंवा कार्डद्वारे व्यवहार केला जातो हे आपल्याल माहितीच आहे. इंटरचेंज शुल्क सामान्यत: कार्ड पेमेंटशी संबंधित असतात आणि व्यवहार स्वीकारण्यासाठी आणि खर्च कव्हर करण्यासाठी आकारले जातात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३० सप्टेंबर २०२३ ला होणार पुनरवालोकन

UPI पेमेंट सिस्टीम सध्या शून्य व्यापारी सवलत म्हणजेच (MDR )मॉडेलवर चालते. मात्र UPI साठी नवीन नियम आल्यामुळे यामध्ये अधिक चार्ज लावला जाऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये चार्जेस संबंधित नवीन मॉडेलचे ३० एप्रिलपर्यंत किंवा त्याआधीच त्याचे पुनरावलोकन केले जाऊ शकते.