जो बायडेन यांचा दावा

innovative experiments in presidential election on american foreign policy
लेख : अमेरिकी परराष्ट्र धोरणाचे प्रयोग..
Gangster Goldy Brar Death News
सिद्धू मुसेवालाच्या हत्येतील मुख्य सूत्रधार गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या?
israeli strikes on rafah kill 18 as gaza death toll tops 34000
इस्रायलच्या राफावरील हल्ल्यात १८  ठार
Iran Israel conflict wrong us policy worsening the west asia situation
अन्वयार्थ : अमेरिकेच्या चुकांची परिणती

सीरियाच्या वायव्येकडील इडलिब प्रांतात रात्री करण्यात आलेल्या हल्ल्यात इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा नेता अबू इब्राहिम अल- कुरैशी हा मारला गेल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी सांगितले.

 संघटनेचा यापूर्वीचा नेता अबू बकर अल-बगदादी हा अमेरिकेने याच भागात केलेल्या हल्ल्यात ठार झाल्यानंतर काही दिवसांतच, म्हणजे ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरैशी याने या दहशतवादी संघटनेच्या प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली होती. अमेरिकेने घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात कुरैशी आणि महिला व मुलांसह त्याचे कुटुंबीय ठार झाले, अशी माहिती अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली.

 या भागात हल्ल्यांची मालिका घडवून आणून आयसिस पुनरुत्थानाचे प्रयत्न करत आहे. गेल्या महिन्यात एका तुरुंगावर ताबा मिळवण्यासाठी त्यांनी १० दिवस हल्ला चढवला होता.

 हेलिकॉप्टरमधून उतरलेल्या अमेरिकेच्या विशेष फौजांनी सीरियात बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या भागातील एका घरावर हल्ला चढवला. यानंतर त्यांची दोन तास बंदूकधारी दहशतवाद्यांशी चकमक झडली. सतत सुरू असलेला गोळीबार व स्फोट यामुळे तुर्कस्तान सीमेजवळील अटमेह शहर हादरले. ६ मुले व ४ महिलांसह १३ जण ठार झाले असल्याचे सुरुवातीच्या वृत्तांमध्ये म्हटले आहे.

 ‘अमेरिकी लोक व आमची मित्रराष्ट्रे यांचे संरक्षण करण्यासाठी आणि जगाला सुरक्षित ठिकाण बनवण्यासाठी’ आपण या मोहिमेचा आदेश दिला, असे बायडेन यांनी एका निवेदनात सांगितले.

*(( कुरैशी राहत असलेल्या घरावर अमेरिकी सैन्याने हल्ला केला.