अरेच्चा, हे काय! पती भांडणच करत नाही म्हणून महिलेनं मागितला घटस्फोट

माझ्या नवऱ्याचे इतकं प्रेम मी सहन करू शकत नाही असं या महिलेने सांगितले आहे.

घर म्हटलं की भांड्याला भांडं लागतच. त्यातून नवरा बायकोच्या कुरबुरी तर नित्याच्याच. कधी कधी तर दोघांमधील वाद टोकाला जाऊन, संसारही मोडल्याचं अनेकवेळा ऐकायला मिळत. पण, पती भांडणच करत नाही म्हणून घटस्फोटासाठी अर्ज केल्याचं कधी ऐकलंय का? पण हे घडलं आहे. उत्तर प्रदेशातील एका महिलेनं पती भांडणच करत नाही, अशी तक्रार करत एका महिलेनं घटस्फोट मागितला आहे. विशेष म्हणजे तिच्या लग्नाला केवळ १८ महिनेच झाले आहेत.

उत्तर प्रदेशातील संभळ जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या महिलेने घटस्फोटासाठी शरिया कोर्टात अर्ज दाखल केला होता. अर्ज दाखल केल्यानंतर शरिया कोर्टानं घटस्फोटचं कारण जाणून घेतलं. घटस्फोट घेण्याचं कारण ऐकून मौलवीही चक्रावून गेले. त्यानंतर मौलवींनी महिलेची मागणी निर्थरक असल्याचं सांगत अर्ज फेटाळून लावला. दैनिक जागरणने या संदर्भात वृत्त दिले आहे.

आणखी वाचा- नाकाबंदीत पोलिसांनी मागितलं ID, एका फोनवर त्याने परिसराचा वीजपुरवठाच खंडित केला

जेव्हा मौलवीने या याचिकेवर निर्णय घेण्यास नकार दिला, तेव्हा हे प्रकरण स्थानिक पंचायतीकडे गेले. त्यांनीही या प्रकरणावर निर्णय घेण्यास असमर्थता दर्शवली. “माझ्या नवऱ्याचे इतकं प्रेम आपण सहन करू शकत नाही. कधीही माझ्यावर ओरडत नाही. कोणत्याही गोष्टीसाठी मला नकार देत नाही. कधी कधी माझ्यासाठी जेवण ही बनवतो आणि घरकामात मदत देखील करतो. माझ्याशी भांडण करत नाही”, अशी तक्रार या महिलेन शरिया कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केली होती.

आणखी वाचा- रागाचा कडेलोट! घरगुती भांडणातून पत्नी आणि सासूची हत्या करत गच्चीवरुन फेकलं खाली

महिलेनं सांगितले की, ‘माझ्य़ाकडून कोणतीही चूक झाली तरी माझ्यावर ओरडत नाही. पती नेहमी मला माफ करुन टाकतो. मला त्याच्याशी भांडण करायचं असतं. त्यामुळे मला असे आयुष्य नकोय की जिथे पती प्रत्येक गोष्टीसाठी सहमत असेल,” अशी तक्रार महिलेनं केली आहे. दरम्यान, पत्नीला नेहमी आनंदी ठेवण्याची इच्छा आहे असे महिलेच्या पतीने सांगितले. कोर्टातून घटस्फोटाचा अर्ज मागे घेण्याची त्याने विनंती केली आहे. कोर्टाने आता दोघांना परस्पर सहमतीनं हा प्रश्न सोडवायला सांगितले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Woman asked for a divorce as her husband was not arguing abn

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या