पुठ्ठे, खळ आणि झिरमिरीत रंगीत कागदांचा वापर करून डोंबिवलीतील ७७ वर्षांचे एक आजोबा गेल्या सात वर्षांपासून पारंपारिक पद्धतीचे आकाशकंदील घरगुती पद्धतीने तयार करीत आहेत. अंगी असलेल्या कौशल्याचा चांगला उपयोग करावा.  कौशल्यातून अन्य कोणाला रोजगार मिळावा, हा या आजोबांचा कंदील पणत्या, चांदण्या बनविण्याचा मुख्य उद्देश आहे. स्वत:कडील आकाशकंदील बनविण्याचे कौशल्य तरुण, तरुणी, महिला बचत गटांनी शिकून त्यांनी स्वसामर्थ्यांवर हा कौशल्याचा व्यवसाय करून स्वत:सह अन्य गरजूंना दोन पैसे मिळविण्यासाठी हातभार लावावा, असे आजोबांचे म्हणणे आहे.

अनेक वर्षांपासून दिवाळी सणात घरोघरी चिनी बनावटीच्या प्लास्टिक चांदण्या, कंदील लावले जातात. हळूहळू या कंदिलांचा एकेक भाग निखळतो. ते प्लॅस्टिक, तो कंदील कचरा म्हणून आपण टाकून देतो. पर्यावरणाचा नाश करणारा घातक प्लॅस्टिक कचरा अशा प्रकारे आपण निर्माण करतो. हे सगळे कोठे तरी थांबले पाहिजे, हाही या उपक्रमामागील आपला उद्देश आहे, असे आजोबांनी सांगितले.

CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
girl Bangladesh sexually assaulted,
डोंबिवलीतील पलावा गृहसंकुलात दोन भावांकडून बांगलादेशमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Nagpur Police, 11 Robbers, Three Crore Rupee Jewelry Heist, robbery in nagpur, nagpur robbery, crime in nagpur, one woman hostage by robbers,
एकटी राहणारी महिला; तीन कोटींच्या दागिन्यांची लूट, हजार सीसीटीव्ही…
alibag mother killed her two kids marathi news
माता नव्हे तू वैरीणी! विवाहबाह्य संबंधांत अडथळा ठरलेल्या २ चिमुकल्यांचा आईनेच घेतला जीव

श्रीकांत गणेश साने (७७) हे आजोबांचे नाव. कळव्याच्या मुकुंद आर्यन कंपनीत २७ वर्ष त्यांनी मेकॅनिकल ड्राफ्ट्समन म्हणून नोकरी केली. काही दिवस सणासाठी लागणाऱ्या साहित्याचे दुकान चालविले. ड्राफ्ट्समन असल्याने अंगी कला होती. ती सतत साने आजोबांना अस्वस्थ करीत होती. दिवाळीच्या दिवसात मित्रांसह एका दुकानात उभे असताना दुकानातील चिनी बनावटीचे प्लॅस्टिकचे कंदील पाहून साने आजोबांनी दुकानदाराला पारंपरिक कागदी बनावटीचे आकाश कंदील विकण्याचा सल्ला दिला आणि ते बनवून देण्याची हमीही दिली.

नंतरच्या दिवाळीपूर्वी बांबूच्या काठय़ा आणून त्याच्या चिपा तयार केल्या. कागद आणून त्याचे हाताने कापकाम, नक्षीकाम केले. खळीचा वापर करून अतिशय कौशल्याने पारंपरिक पद्धतीचे ७५ आकाशकंदील तयार झाले. दुकानदाराने ते हसत खरेदी केले. घरगुती पद्धतीच्या या आकाशकंदिलावर ग्राहकांच्या खरेदीसाठी उडय़ा पडल्या. ७५ कंदील हातोहात संपले. दुसऱ्या वर्षी दुकानदाराने साने यांना वाढीव कंदील करण्यास सांगितले. त्याप्रमाणे दीडशे कंदील तयार केले. हे कंदील पाहून अनेक रहिवासी घरी येऊन कंदिलाची मागणी नोंदवू लागले. कंदिलाची मागणी वाढू लागले. तीन वर्षे हे काम सुरू होते. बांबूच्या चिपा आणून त्याची जुळवाजुळवीत बराच वेळ जायचा. कंदील बनविण्याचा वेग वाढविण्यासाठी साने यांनी बांबूच्या चिपांपासूनचे काम बंद केले. त्यासाठी कामाची पद्धत बदलली. पुठ्ठय़ांच्या कंदिलाच्या आकाराचे साचे केले. त्यात पुठ्ठे दुमडले की त्याचा कंदील तयार होतो. कंदिलांना फुले, पणत्या,  स्वस्तिक व वेण्या लागतात. साने ही कला सध्या गरीब मुलांनाही शिकवत आहेत.