Motor Vehicle ACT : आता वाहनांच्या मालकांना रजिस्ट्रेशनच्या कोणत्याही सेवांसाठी मोबाइलची नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. केंद्र सरकारने १९८८ मध्ये तयार झालेल्या मोटार वाहन अधिनियम या कायद्यात नुकतेच आमूलाग्र बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार, दुचाकी, कार किंवा अन्य कोणतेही वाहन खरेदी करताना आता मोबाइल नंबर अनिवार्य केला आहे. रस्ते वाहतूक आणि राज्य महामार्ग मंत्रालयाने वाहनांच्या रजिस्ट्रेशन संबंधित कोणत्याही सेवांसाठी मोबाइल क्रमांक द्यावा लागणार आहे. म्हणजेच वाहनांच्या नंबरसाठी मोबाइल क्रमांकही देणं अनिवार्य आहे.

रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या आधिकाऱ्यानं सांगितले की, गेल्या आठवड्यात विविध अर्जावर संशोधन करून अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार यापुढे मोटर वाहनांच्या संबंधित सेवांसाठी मोबाइल नोंदणी अनिवार्य आहे. रजिस्ट्रेशन, स्थानांतरण, रिन्यूल, डुप्लिकेट कॉपी, एनओसी, अॅड्रेस बदल करायचा असेल, हायर/ खरीद / हाइपोथीशन यासह सर्व सेंवासाठी मोबाइल नोंदणी अनिवार्य आहे.

दळणवळण सेवांमध्ये बदल करण्यासाठी मोटार वाहन कायद्यामध्ये केंद्र सरकारने विविध बदल केले आहेत. ट्रान्सपोर्ट व्यवस्थेत चांगली सुधारणा व्हावी यासाठी केंद्र सरकारने वाहन कायद्यात अमुलाग्र बदल करत आहे. गेल्यावर्षी ट्रफिक नियमांत बदल केले होते. या नव्या नियमांनुसार लोकांना मोठी रकम भरावी लागतेय. वाढते रस्ते अपघात रोखण्याचा उपाय म्हणून दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. यात कमीत कमी म्हणजे ५०० रुपये दंड हा रस्ते नियम तोडण्यासाठी असून जास्तीत जास्त म्हणजे २५ हजार रुपये दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास हा अल्पवयीन मुला-मुलीने वाहन चालवून गुन्हा केल्यास मालक वा पालकाला भोगावा लागणार आहे