Premium

२१ देशांमध्ये खेळला गेला ‘कचरा वर्ल्डकप’; जाणून घ्या कचरा वर्ल्डकप म्हणजे नेमकं काय?

Garbage World Cup: जाणून घ्या कचरा वर्ल्डकप म्हणजे नेमकं काय?

Do you know about garbage world cup spogomi world cup know what is garbage world cup
२१ देशांमध्ये झाला कचरा वर्ल्डकपचा थरार( Image Source : SPOGOMI )

What is the Garbage World Cup: क्रिकेट विश्वचषक, हॉकी विश्वचषक आणि फुटबॉल विश्वचषकाबद्दल सर्वांनी ऐकले असेलच, पण कचरा विश्वचषकाबद्दल तुम्हाला माहितीये का. आज आम्ही तुम्हाला जगातील एका अनोख्या खेळाबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये अनेक देशांचे खेळाडू सहभागी होतात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या खेळात लोक कचरा गोळा करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कचरा वर्ल्ड कप म्हणजे काय?

हा एक अनोखा खेळ आहे, जो जपानमध्ये सुरू झाला आहे. स्पोगोमी वर्ल्ड कप असे या खेळाचे नाव आहे. हा जपानी शब्द आहे, ज्याचा अर्थ कचरा गोळा करणे. नुकत्याच झालेल्या या खेळात २१ देशांचे खेळाडू सहभागी झाले होते. वास्तविक, या खेळाचा उद्देश संपूर्ण जगात स्वच्छता आणि पर्यावरणीय समस्यांबाबत जनजागृती करणे हा आहे.

कोण ठरला विजेता

या विश्वचषकात २१ देशांनी भाग घेतला होता, पण ब्रिटन या खेळाचा विजेता ठरला. या खेळादरम्यान सर्व संघांनी १२०८ पौंड कचरा गोळा केला. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा कचरा त्यांना शहरातून उचलायचा होता. म्हणजे कोणत्याही खाजगी मालमत्तेचा कचरा तुम्ही उचलू शकत नाही. यात ब्रिटीश खेळाडू पुढे होते आणि त्यांनी २० मिनिटांत सर्वाधिक कचरा गोळा केला. हा गेम निप्पॉन फाऊंडेशनने आयोजित केला होता. आता हा गेम २०२५ मध्ये टोकियोमध्ये पुन्हा आयोजित केला जाणार आहे.

हेही वाचा >> अजबच! १४,५०० फूट उंचीवरून महिला कोसळली थेट जमिनीवर; पण मुंग्यांमुळे वाचला जीव! कसा ते वाचा….

जपानच्या संघाच्या पराभवावर जपानी न्यूज वेबसाईट द मैनिचीशी बोलताना जपानी संघाचे सदस्य टोमो ताकाहाशी म्हणाले की, आम्ही ही स्पर्धा हरलो हे खूप निराशाजनक आहे. आम्हाला आधीच जिंकायचे होते. हा पराभव आम्ही विसरणार नाही, २०२५साली होणाऱ्या विश्वचषकात विजय दाखवून देऊ, असे ते म्हणाले. यासोबतच ते म्हणाले की, आम्हाला आशा आहे की या खेळानंतर जगभरातील लोक पर्यावरणाच्या प्रश्नात अधिक रस घेतील.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Do you know about garbage world cup spogomi world cup know what is garbage world cup this country became the winner srk

First published on: 03-12-2023 at 15:07 IST
Next Story
ट्रेनच्या टॉयलेटमधील नॉर्मल आणि इमर्जन्सी फ्लशमध्ये नेमका काय फरक असतो? वापर कसा करायचा? जाणून घ्या