How To Do UPI Payment Through Feature Phone: रिझर्व बँक ऑफ इंडियाकडुन फीचर फोनमध्ये युपीआय पेमेंट करण्याची सुविधा काही महिन्यांपुर्वी सुरू करण्यात आली. यामुळे फीचर फोन वापरणाऱ्यांनाही युपीआय पेमेंट वापरता येणार आहे. UPI 123PAY ४० कोटी फीचर फोन्सना इंटरनेटशिवाय डिजिटल ट्रांजॅक्शन वापरण्याची सुविधा उपलब्ध करते.

मिस्ड कॉल बेस्ड स्ट्रॅटर्जी, प्रॉग्जीमिटी साऊंड बेस्ट पेमेंट, कॉलिंग आयवीआर, फीचर फोनवर अ‍ॅप वापरणे या चार सुविधा 123 PAY वर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या ४ टेक्नॉलॉजीचा वापर करून फीचर फोनवरून युपीआय पेमेंट करता येते. फीचर फोनवरून युपीआय पेमेंट करण्याच्या सोप्या स्टेप्स जाणून घ्या.

Sanjay Mone Sukanya Mone kulkarni Why don't work together
संजय मोने-सुकन्या मोने का करत नाहीत एकत्र काम? जाणून घ्या…
blue-coloured ghee rice
तुम्ही खाऊ शकता का हा निळ्या रंगाचा भात? Viral Video पाहून चक्रावले नेटकरी
Pregnant Lady Dance On Kuch Kuch Hota Hai Video
“बाळाचा जीव धोक्यात..”, गर्भवतीचा हॉस्पिटलमधील बेभान डान्स पाहून नेटकरी भडकले, पाहा Video
vada pav recipe
वडापाव नव्हे! इडली वडापाव; कधी खाल्ला का? जाणून घ्या ही सोपी रेसिपी

फीचर फोनवरून युपीआय पेमेंट करण्याच्या सोप्या स्टेप्स

  • आयवीआर क्रमांक 080 4516 3666, 080 4516 3581, किंवा 6366 200 200 या क्रमांकावर फीचर फोनवरून कॉल करा. हा फोन नंबर बँक अकाउंटशी लिंक असणे आवश्यक आहे.
  • युपीआय बँकिंगशी लिंक करू इच्छिणाऱ्या बँक अकाउंटचे डिटेल्स कॉलमध्ये सांगा.
  • तिथे अकाउंट्सची लिस्ट दिसेल, त्यातील तुमच्या अकाउंटवर क्लिक करा.
  • त्यानंतर युपीआय पिन सेट करण्यास सांगितले जाईल.
  • बँक डेबिट कार्डचे शेवटचे सहा अंक सबमिट केल्यानंतर, तुम्हाला ओटीपी पाठवला जाईल.
  • सर्व व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्ही युपीआय पिन सेट करू शकता.
  • त्यानंतर युजर प्रोफाईल बनवले जाईल.
  • या सर्व स्टेप्स झाल्यानंतर फीचर फोनवरून 123 PAY चा वापर करुन ऑनलाईन ट्रांजॅक्शन करू शकता.

फीचर फोनवरून 123 PAY चा वापर करून पैसे पाठवण्यासाठी पुढील स्टेप्स वापरा

  • 080 4516 3666, 080 4516 3581, किंवा 6366 200 200 या आयवीआर क्रमांकावर रेजीस्टर केलेल्या नंबरवरून कॉल करा.
  • त्यानंतर हा क्रमांक योग्य आहे का याची तपासणी केली जाईल.
  • त्यानंतर ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्यांचा फोन नंबर सबमिट करा.
  • डिटेल्स सबमिट करून कन्फर्म पर्याय निवडा.
  • त्यानंतर तुम्हाला किती रक्कम पाठवायची आहे ती निवडा.
  • युपीआय पिन सबमिट करून तुम्ही फीचर फोनवरून पैसे ट्रान्सफर करू शकता.