Phineas Gage Accident and Impact on Psychology: माणसाचा मेंदू म्हणजे असंख्य मार्ग, असंख्य ठिकाणी, असंख्य प्रकारे एकमेकांना छेदून पुढे जाणारं प्रचंड भुयार आहे! कारण अवघ्या दोन अक्षरांची ओळख असणारा माणसाच्या शरीरातला हा अवयव लाखो प्रकारच्या गोष्टी, घडामोडी आणि प्रक्रिया रोज करत असतो. आपल्या एवढ्याशा मेंदूत रोज काय काय करामती घडत असतात, याचा पूर्ण ताळेबंद अद्याप जगभरातल्या शास्त्रज्ञांना लावता आलेला नाही. पण तरीही जेवढा ताळेबंद हाती लागला आहे, तोही आपल्या सामान्य मेंदूत येणाऱ्या कल्पनांच्या आवाक्याबाहेरचा आहे!

मेंदूचं असंच एक मोठं गूढ उकलण्यासाठी एक विचित्र अपघात कारणीभूत ठरला होता, असं म्हटलं तर कुणाचा विश्वास बसेल? पण हे खरं आहे. १३ सप्टेंबर १८४८ रोजी झालेल्या त्या अपघाताची नोंद त्यानंतर कित्येक वर्षे, कित्येक शोधनिबंध, पुस्तकं, चर्चासत्रं आणि संशोधनांमध्ये घेतली गेली, एवढा तो महत्त्वाचा ठरला. पण असं काय घडलं होतं त्या अपघातामध्ये?

Animal fight video deer vs crocodile video
VIDEO: “नशीब नाही मित्रा प्रयत्नांचा खेळ आहे”, हरणानं मृत्यूच्या दारातून मारलेली उडी पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Naveen Ul Haq Teased with Virat Kohli video
Naveen Ul Haq Virat Kohli : विराट कोहलीच्या रील्समुळे नवीन उल हक वैतागला, VIDEO होतोय व्हायरल
iPhone 16 Design & Colour Options
iPhone 16 ‘या’ पाच कलर ऑप्शन्ससह येणार? कॅमेरा, डिस्प्ले, डिझाइनबद्दल ‘ही’ माहिती जाणून घ्या
Javelin thrower Neeraj Chopra opinion on 90 m distance debate sport news
अंतराबाबतची चर्चा आपण देवावर सोडूया! ९० मीटरच्या टप्प्याबाबत भालाफेकपटू नीरज चोप्राचे मत
stock market today sensex nifty drop after rbi keeps repo rate unchanged
रिझर्व्ह बँकेच्या धोरण कठोरतेवर नाराजी; ‘सेन्सेक्स’ची ५८१ अंशांनी घसरंगुडी
Vinesh Phogat disqualified actress swara bhaskar raised questioned
Vinesh Phogat Disqualified : ‘१०० ग्रॅम जास्त वजनाच्या कथेवर तुमचा विश्वास आहे का?’ विनेश फोगटच्या अपात्रतेवर स्वरा भास्करने उपस्थित केला प्रश्न
Wayand dog Viral video Dog after seeing its owners who were missing for 6 days in Wayanad Video
Kerala Wayanad: वायनाडमधील ‘हा’ VIDEO तुमच्याही चेहऱ्यावर हसू आणेल; ६ दिवसांनी मालक दिसल्यावर कुत्र्यानं काय केलं पाहा

कवटीला भोकं पाडून मेंदूच्या रचनेचा अभ्यास!

सुप्रसिद्ध साहित्यिक अच्युत गोडबोले यांनी त्यांच्या ‘मनात’ या पुस्तकात मेंदूच्या अभ्यासाच्या सुरुवातीपासून अगदी हल्लीपर्यंतच्या विविध प्रकारच्या उपचार पद्धतींपर्यंत मेंदूचं विलक्षण वास्तव मांडलं आहे. आपलं मन डोक्यात असतं की ह्रदयात? शरीर मेंदू नियंत्रित करतं की मन? मन आणि आत्मा एकच की वेगवेगळे? असे अनेक प्रश्न मानवाला हजारो वर्षांपासून पडत आले आहेत. हजारो वर्षांपूर्वी हा अभ्यास करण्यासाठी मेलेल्या माणसांच्या कवटीला भोकं पाडून आतल्या मेंदूची रचना अभ्यासण्याचे प्रकारही काही संदर्भांमध्ये आढळतात. पण व्यापक अर्थाने गेल्या ५०० वर्षांमध्ये मेंदूची रचना, त्याचे विकार आणि त्यावरचे उपचार या तीन मूलभूत बाबींवर सखोल आणि यशस्वी संशोधन झाल्याचं आढळून येतं.

तर फिनिआज गेजचा हा अपघात होण्याआधी आपला मेंदू म्हणजे एकच काहीतरी गोष्ट असून तीच शरीरातल्या सर्व गोष्टी नियंत्रित करते, अशीच धारणा होती. त्यामुळे मेंदूतल्या विविध रचना, त्यांची कार्ये यांचा उलगडा तोपर्यंत व्हायचा होता. पण १३ सप्टेंबर १८४८ रोजी अमेरिकेच्या व्हर्मोंटमध्ये फिनिआज गेज नावाच्या एका सुपरवायजरचा अपघात झाला आणि मेंदूमधल्या गूढ यंत्रणांविषयीचा जगाचा दृष्टीकोनच बदलून गेला!

…आणि लोखंडी रॉड फिनिआजच्या कवटीतून आरपार गेला!

त्या दिवशी व्हर्मोंटमधल्या कॅव्हेंडिश भागाजवळ रेल्वेची लाईन टाकण्याचं एक काम चालू होतं. तिथे काम करणाऱ्या कामगारांवर फिनिआज गेज नावाचा एक कर्मचारी सुपरवायजरप्रमाणे देखरेख आणि सूचना देण्याचं काम करत होता. या कामासाठी स्फोटकांचा वापर केला जात होता. त्या दिवशी स्फोटकांचा स्फोट होताच बाजूलाच पडलेला एक जाड लोखंडी रॉड आडोश्याला उभ्या असलेल्या फिनिआज गेजच्या डोक्यात घुसला. वरच्या बाजूने घुसलेला हा रॉड थेट त्याच्या गालातून बाहेर आला. हा धक्का एवढा जोरात होता की त्यामुळे गेज किमान लांब जाऊन आदळला.

गेजच्या वाचण्याची सुतराम शक्यता तिथे उपस्थित कुणालाही वाटत नव्हती. तरीही एका माणसानं त्याला बैलगाडीत घालून जवळच्या लॉजवर नेऊन ठेवलं. एकान नंतर त्याच्या शवपेटिकेसाठी त्याचं मोजमापही नेलं. पण तिथे एडवर्ड विल्यमस आणि जॉन हार्लो या दोन स्थानिक डॉक्टरांनी त्याच्यावर त्यांच्याकडच्या बऱ्याच प्रकारच्या औषधांचा वापर केला. त्याच्या कवटीत घुसलेला रॉड कापून बाहेर काढण्यात आला. गेजच्या कवटीला एक आख्खी मूठ जाईल एवढं भोक पडलं होतं. त्याच्या मेंदूच्या फ्रंटल लोबमधून घुसून हा रॉड थेट त्याच्या डाव्या गालातून बाहेर आला होता. या दुखापतीत त्याचा डावा डोळाही कायमचा निकामी झाला. पण बरेच दिवस हे उपचार चालल्यानंतर गेज चक्क बरा झाला!

गेज बरा तर झाला, पण…

अच्युत गोडबोले यांनी त्यांच्या पुस्तकात या घटनेचं वर्णन केलं आहे. गेज बरा होऊन त्याच्या कुटुंबाकडे परतला खरा. सुरुवातीला त्याची वागणूक सामान्यच वाटली. पण हळूहळू त्याच्या वागणुकीत बदल जाणवू लागला. आधी शांतस्वभावी असणारा गेज अपघातानंतर चिडचिडा झाला होता. शीघ्रकोपी स्वभाव बळावला होता. त्याचा लाजाळूपणा तर कुठल्याकुठे उडून गेला होता.

चांगले मित्र आपल्याला मानसिक आरोग्याच्या समस्यांपासून कसे दूर ठेवतात? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….

अपघाताआधीचा गेज आणि अपघातानंतरचा गेज यात मोठा फरक सगळ्यांना जाणवू लागला. त्यामुळे सगळेच बुचकळ्यात पडले होते. अपघातानंतर १२ वर्षं गेज असाच जगला. पण १८६० साली त्याची प्रकृती ढासळली. त्याचवर्षी रुग्णालयात उपचारांदरम्यान गेजचा मृत्यू झाला. पुढच्या सात वर्षांत अनेक मनोविश्लेषकांनी गेजच्या अपघाताचा त्याच्या वर्तनातील बदलाशी संबंध अभ्यासून पाहिला आणि तिथेच मेंदूच्या अभ्यासाचा मोठा टप्पा पार झाला.

मेंदू एकच, पण भाग अनेक!

रॉड कवटीतून आरपार गेल्यानंतर गेजच्या मेंदूच्या विशिष्ट भागाला मोठी इजा झाली. त्यामुळेच त्याच्या वर्तनात नंतर बदल घडल्याच्या निदानापर्यंत मनोविश्लेषक पोहोचले. पण त्याचवेळी गेजचं वर्तन पूर्णपणे बदललं नसून त्याच्या काही गोष्टीच बदलल्या होत्या, हेही त्यांच्या निदर्शनास आलं. त्यामुळे शरीरातल्या वेगवेगळ्या प्रक्रिया नियंत्रित करण्यासाठी, विशेष म्हणजे आपल्या स्वभावातील वेगवेगळ्या गोष्टी नियंत्रित करण्यासाठी आपल्या एवढ्याशा मेंदूमध्ये वेगवेगळी सर्किट्स अस्तित्वात असतात, या निष्कर्षापर्यंत मनोविश्लेषक येऊन पोहोचले!

पुढच्या दीडशे वर्षांत मेंदूच्या अभ्यासात झालेली विलक्षण प्रगती फिनिआज गेजच्या अपघातातून सिद्ध झालेल्या या गृहितकावर अधिक वेगवान झाली. त्याचं महत्त्व लक्षात आल्यानंतर मृत्यूच्या ७ वर्षांनंतर, अर्थात १८६७ साली गेजचा पुरलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढून त्याचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्याची भोक पडलेली कवटी आणि तो लोखंडी रॉड हार्वर्डच्या मेडिकल स्कूलला भेट देण्यात आला. मानवी मेंदूच्या अभ्यासातील क्रांतीकारक घटनेची साक्षीदार ठरलेली ती कवटी आजही काऊंटी वे लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये पाहायला मिळते.