भारतात बंदी आणली असली तरीही तुम्ही PUBG खेळू शकता; जाणून घ्या नेमकं कसं?

पबजीसह ११८ मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी

केंद्र सरकारने चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून चिनी कंपन्यांशी संबंध असणाऱ्या ११८ मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी आणली आहे. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये तरुणाईमध्ये प्रचंड वेड असणाऱ्या पबजी गेमचाही समावेश आहे. भारतात तीन कोटींहून जास्त पबजी युजर्स असल्याचा रिपोर्ट आहे. पण भारतात पबजी गेमवर बंदी आणली असली तरी तो खेळता येणं शक्य आहे.

ते कसं काय?
हे कसं काय शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर तुमच्या माहितीसाठी पबजीचे दोन अ‍ॅप आहेत. पबजी गेम हा खऱ्या अर्थाने कॉम्प्यूटरवर खेळण्यासाठी तयार करण्यात आला होता. दक्षिण कोरियाच्या कंपनीने हा गेम तयार केला आहे. हा गेम भारतात अद्यापही उपलब्ध आहे. पण हा गेम फक्त कॉम्प्यूटर किंवा लॅपटॉपवरच खेळला जाऊ शकतो.

अखेर पबजीवर बंदी, मोदी सरकारकडून आणखी ११८ अ‍ॅप्सवर बंदीचा निर्णय

पण मग बॅन केलाय तो पबजी गेम कोणता ?
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीत PUBG Mobile आणि PUBG Mobile Lite यांचा उल्लेख आहे. हे गेम दक्षिण कोरियामधील कंपनीच्या परवान्यावर चिनी कंपनी Tencent ने तयार केलेले आहेत. केंद्र सरकारने या अ‍ॅपवर बंदी आणली आहे.

मग बॅन करुन काय फायदा?
केंद्र सरकारने दक्षिण कोरियाच्या नाही तर चिनी कंपनीचा संबंध असणाऱ्या PUBG Mobile आणि PUBG Mobile Lite यांच्यावर बंदी आणली आहे. यामुळे आता मोबाइलवर गेम खेळता येणार नाही. फक्त कॉम्प्यूटर किंवा लॅपटॉपवरच खेळता येणं शक्य आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pubg mobile is now banned in india but not pubg sgy

ताज्या बातम्या