भारतीय संसदेमध्ये देशभरामधून निवडून आलेले ५४३ खासदार आहेत. संसदेची आसनसंख्या ५४५ आहे. तरीही संसदेमध्ये ४२० क्रमांकाचे आसन नसते. मग संसदेमध्ये ४१९ आणि ४२१ च्या मध्ये कोणता क्रमांक येतो? ४१९ नंतर कोणते आसन येते ? हे आसन नाकारण्यात आले का त्याची निर्मितीच नाही झाली? ५४३ आमदारांमध्ये ‘४२०’ हा क्रमांक नसतो का? ४२० चा कायद्याच्या भाषेत अर्थ काय ? हे जाणून घेणे माहितीपूर्ण आणि रंजक ठरेल.

भारताच्या संसदेमध्ये देशभरातील ५४३ खासदार प्रदेशांचे प्रतिनिधित्व करत असतात. संसदेमध्ये ५४५ आसने खासदारांसाठी आहेत. परंतु, यामध्ये ४२० क्रमांकाचे आसन नाही. मग तेथे कोणते आसन असते, हे जाणण्यासाठी लोकसत्ताच्या दिल्ली प्रतिनिधींद्वारे लोकसभेच्या मीडिया प्रतिनिधींशी संपर्क साधला. तेव्हा मिळालेल्या माहितीनुसार संसदेमध्ये ४२० क्रमांकाचे आसन नसते.

Prakash Javadekar believes that the BJP will win more than five seats in a three way contest in Kerala
केरळमध्ये तिरंगी लढतीत भाजप पाच पेक्षा जास्त जागा जिंकणार- जावडेकर
us citizenship news
अमेरिकेचं कायमस्वरुपी नागरिकत्व स्वीकारणाऱ्यांमध्ये भारतीय दुसऱ्या क्रमांकावर; २०२२ चा आकडा थेट ६६ हजारांच्या घरात!
megha engineering
निवडणूक रोखे खरेदीत देशात दुसऱ्या क्रमांकावर असणारी मेघा इंजिनिअरिंग कंपनी CBI च्या रडारवर! गुन्हा दाखल
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?

हेही वाचा : तारांकित/अतारांकित प्रश्न म्हणजे काय? अधिवेशनातील शून्य प्रहर म्हणजे काय?

फसवणूक करणाऱ्याविरोधात भारतीय दंड संहितेनुसार ४२० कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो. तसेच कोणी कुठली फसवणूक केली असेल तर त्याला ‘४२०’ म्हणण्यात येते. १३ या क्रमांकाला जसे नकारात्मक वलय आहे, तसेच ‘४२०’ या क्रमांकाला आहे. कोणालाही स्वतःला ‘४२०’ म्हटलेले आवडत नाही. संसद भवन हे तर खासदारांच्या प्रतिष्ठेचे असते. त्यामुळे या भवनामध्ये ‘४२०’ क्रमांकाचे आसन मिळणे अपमानास्पद वाटू शकते. त्यामुळे संसदेत ‘४२०’ क्रमांकाचे आसन नाकारण्यात आले.

आसन क्रमांक ४२० ला पर्याय ?

लोकसभेमध्ये ‘४२०’ क्रमांकाचे आसन नसून ४१९, ४१९ ए, ४२१ अशी आसनरचना आहे. आसन क्र. ४२० करिता ‘४१९-ए’ ही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी बैजयंत जय पांडा (Baijayant Jay Panda) ज्यांनी लोकसभेमध्ये ओडिसा राज्यातून प्रतिनिधित्व केले आहे, तसेच भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष-प्रवक्ता आहेत, त्यांनी ट्विट केले होते. त्या ट्विटमध्ये ‘४१९-ए’ या क्रमांकाच्या खुर्चीचे छायाचित्र पोस्ट करून ‘That’s right, the Lok Sabha does not have a seat numbered 420. Like many buildings that call their 13th floor 14 ?’ असे म्हटले होते.

हेही वाचा : मिठाचा खडा टाकणारे शकुनीमामा आहेत तरी कोण ? ‘शकुनीमामा’ला नकारात्मक वलय का मिळाले ?

कोणी नाकारले होते ४२० क्रमांकाचे आसन?

संसदेमध्ये ४२० क्रमांकाचे आसन होते. परंतु, खासदारांनी हे आसन स्वीकारण्यास नकार दर्शवला. त्यासंदर्भात लोकसभा सचिवांकडे प्रस्तावदेखील दाखल केला. ‘फसवणुकीच्या गुन्ह्यासंदर्भात ४२० हे कलम असल्यामुळे हे आसन नको’ असे त्यांचे मत होते. त्यामुळे विशेषाधिकारांचा वापर करून ‘४१९-ए’ या क्रमांकाच्या आसनाची निर्मिती करण्यात आली.

‘४२०’ची भीती का ? अर्थ काय ‘४२०’चा ?

भारतीय दंड विधान कलम ४२० नुसार फसवणूक, मालमत्तेची लुबाडणूक आणि अप्रामाणिक कृत्य हा दंडनीय अपराध आहे. त्यासाठी कारावासाची शिक्षा होऊ शकते. यासाठी ‘आसन क्रमांक ४२०’ कोणीही स्वीकारत नाही. त्या क्रमांकाला असणारे नकारात्मक वलय आपल्या प्रतिष्ठेला बाधा आणेल, म्हणून संसद प्रतिनिधींनी हे आसन स्वीकारण्यास नकार दिला.