बलात्कार, खून किंवा बॉम्बस्फोट अशा गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींना फाशीची शिक्षा दिली जाते. दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना फाशीची शिक्षा दिली गेली होती. त्याप्रमाणे दहशतवादी अजमल कसाब व मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनला फाशी देण्यात आली होती. फाशी देण्यापूर्वी कैद्याला त्याची शेवटची इच्छा विचारली जाते, असं आपण चित्रपटांमध्ये पाहिलंय. टोमॅटोने बनवलं लखपती! शेतकऱ्याने एका दिवसात विकले ३८ लाखांचे टोमॅटो, म्हणाला, “खतं आणि कीटकनाशकांबद्दल…” खरोखर फाशीची शिक्षा देण्यापूर्वी कैद्याला शेवटची इच्छा विचारली जाते का? ती शेवटची इच्छा कोणत्या प्रकारची असते? याबाबतचा खुलासा तिहाड तुरुंगाचे माजी जेलर सुनील गुप्ता यांनी केला आहे. 'लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत सुनील गुप्ता म्हणाले, "काय खायचंय? अशी शेवटची इच्छा कैद्याला विचारली जात नाही. काही तासांनी तो जिवंत नसेल, हे कैद्याला माहीत असतं. त्यामुळे मला हे खायचंय किंवा ते खायचंय असं तो म्हणणार नाही. या सर्व फक्त कथा आहेत, सत्य नाही." अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड २’वर बंदी? चित्रपटातील संवाद व दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप शेवटची इच्छा कोणत्या प्रकारची असते, जी पूर्ण केली जाते याबद्दलही त्यांनी सांगितलं. "शेवटची इच्छा म्हणजे फाशीच्या दिवशी एक दंडाधिकारी येतात आणि ते कैद्याला विचारतात की तुझी काही संपत्ती आहे का? असेल तर ती कोणाच्या नावे करायची आहे, ही शेवटची इच्छा असते. एखाद्या कैद्याजवळ घर किंवा पैसे असतील तर तो दंडाधिकाऱ्यांना कुणाच्या नावे करायचं आहे ते सांगतो. खाण्या-पिण्याबद्दलच्या शेवटच्या इच्छा या फक्त चित्रपटात दाखवल्या जातात, तसं तर शेवटची इच्छा म्हणून एखादा कैदी म्हणेल त्याला फाशीही देऊ नका, पण तसं करता येत नाही," असं सुनील गुप्ता म्हणाले.