द बेस्ट ऑर निथग.. ही मर्सडिीजची टॅगलाइन आहे. गुणवत्तेच्या आणि सुरक्षिततेच्या बाबतीत मर्सडिीजकडे कोणतीही तडजोड नाही. त्यांच्या प्रत्येक क्लासच्या गाडीत या दोन्हीचे प्रतििबब उमटलेले दिसते. त्यामुळेच मर्सडिीज म्हटले की सर्वोत्तमच, असे आपोआप म्हटले जाते..
जीएलए क्लास
कॉम्पॅक्ट एसयूव्ही प्रकाराची ही गाडी आहे. सर्व प्रकारचे हवामान, जमीन, डोंगररस्ते, खडकाळ जमीन वगरे ठिकाणी चालू शकणारी ही गाडी आहे. गाडीच्या चाचणीसाठी ती थेट जर्मनीतील मर्सडिीजचा स्टुटगार्ट येथील प्लांटवरून ही गाडी पुण्यातील चाकण येथील प्लांटपर्यंत चालवत आणण्यात आली. ११ देश आणि १८ दिवसांचा हा प्रवास होता. या चाचणीनंतरच गाडीचे लाँचिंग करण्यात आले. गाडीचे बोनेट थोडे वर उचलण्यात आले आहे. त्यामुळे ड्रायिव्हग सीटला बसल्यावर आपण एखादी एसयूव्ही चालवत आहोत, असा भास होतो. आकर्षक अशा लाल रंगात जीएलए क्लास ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही उपलब्ध आहे. या गाडीची किंमत ३४ लाखांपासून सुरू होते. यात २०० स्पोर्ट, २०० सीडीआय स्पोर्ट, सीडीआय स्टाइल आदी प्रकार उपलब्ध आहेत.

ई कॅब्रिओलेट
तब्बल चार हजार सीसी इंजिनक्षमता असलेली ही गाडी पाहताच कोणत्याही कारप्रेमीचा कालिजा खल्लास होईल. दिसायला ही गाडी विदाऊट रूफ (छपराशिवाय) असली तरी हव्या त्या वेळी रूफ लावता येऊ शकेल अशी सुविधा या गाडीत आहे. आणि हे रूफही फॅब्रिकचे आहे, शिवाय तुम्हाला हवा तो कलर तुम्ही निवडू शकता या रूफचा. गाडी खुली असली तरी एसी लावल्यास त्याची हवा गाडीतच खेळती राहील, याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. मागच्या बाजूला एक पडदा लावण्यात आला असून एसीची हवा त्याला आपटून ही हवा गाडीतच खेळवली जाते. याशिवाय गाडीतील प्रवाशांसाठी सात एअरबॅग्ज, अ‍ॅडजस्टेबल सीट्स, भरपूर लेग व बूट स्पेस असलेली ही गाडी आहे. ऑटोमॅटिक ट्रान्स्मिशन असलेल्या या गाडीची किंमत एक कोटी रुपये आहे.

सीएलए क्लास
एन्ट्री लेव्हल सेडान असलेली सीएलएस सध्या सर्वात लोकप्रिय मॉडेल आहे. ड्रायव्हरच्या डाव्या बाजूला टचस्क्रीन देण्यात आला आहे. याला कमांड असे नाव आहे. या टचस्क्रीनवर तुम्ही तुमच्या पुढील प्रवासासाठी नेव्हिगेशन सिस्टीम सुरू करू शकता अथवा मग म्युझिक सिस्टीम लावू शकता. रीअर कॅमेराही यालाच अटॅच असल्याने पाìकग करतेवेळी त्याची मदत होते. हायवेला तुम्ही गाडी बाजूला घेऊन काही वेळ थांबलात तर गाडी सुरू करते वेळी सराऊंिडग कॅमेरा कार्यान्वित होतो. चेक सराऊंिडग म्हणून एक पर्याय स्क्रीनवर दिसतो. जेणेकरून गाडीच्या खाली, मागे, पुढे खड्डा आहे किंवा कसे तसेच मागून गाडय़ा येत आहेत किंवा कसे याचे निरीक्षण या कॅमेरातून करता येते. हायवेला टॉप स्पीडला (डी ७) गाडी लागली की तुम्ही क्रूझ कंट्रोल हा पर्यायही निवडू शकता. गाडी सुरू केल्यानंतर शून्यापासून ते ६० सेकंदांपर्यंत उच्च प्रतिचा वेग गाठू शकते. डी १ ते डी ७ अशी अ‍ॅटोमॅटिक गीअर शिफ्ट पद्धती यात आहे. किंमत ३० लाखांच्या पुढे आहे.

सी क्लास
मर्सडिीजच्या या प्रकारातील गाडीला यंदाचा सर्वोत्कृष्ट सेडान हा किताब मिळाला. मर्सडिीजचे मालक कार्ल बेन्झ यांची स्वाक्षरी असलेल्या मर्यादित गाडय़ा सध्या उपलब्ध आहेत. आरामदायी अशी ही गाडी असून सर्व प्रकारच्या सोयीसुविधा सी क्लासमध्ये आहेत. ऑटो ट्रान्स्मिशनवर चालणारी ही गाडी कॉर्पोरेट जगतात अधिक लोकप्रिय आहे. त्यात पाच वेगवेगळ्या ड्रायिव्हग मोडची सुविधा उपलब्ध आहेत. तसेच बाहेरील तापमानानुसार सी क्लास ही गाडी आतील तापमान स्वयंनियंत्रित करते. या गाडीची किंमत ४१ लाखांपासून पुढे सुरू होते.

एस क्लास
अत्यंत दणकट, बुलेटप्रूफ आणि बॉम्बप्रूफ अशी ही गाडी आहे. या गाडीची किंमत कोटय़वधींमध्येच आहे. फार कमी लोकांकडे ही गाडी दिसते. अभिनेता आमीर खान याच्याकडे ही गाडी आहे. गाडीची किंमत दीड कोटी रुपये आहे.

ई क्लास
ई क्लास ही गाडी कॉर्पोरेट जगतात सगळ्यात लोकप्रिय आहे. आतून अत्यंत स्पेशिअस असलेली ही गाडी कॉर्पोरेट मीटिंगसाठीही वापरली जाते.

जीएल क्लास
जीएल क्लास ही एसयूव्ही प्रकारातील गाडी आहे. तीन वर्षांपूर्वी मर्सडिीजने ही गाडी बाजारात उतरवली होती. आजही हिची क्रेझ कायम आहे. सात जणांना आरामात प्रवास करता येऊ शकेल अशी व्यवस्था या गाडीत आहे. शिवाय मागच्या बाजूचे सीट्स फोल्ड करून आत भरपूर सामानही ठेवता येऊ शकते. किंमत ७५ लाखांच्या पुढे.

एमएल क्लास
एसयूव्ही प्रकारातील मर्सडिीजची सर्वाधिक लोकप्रिय गाडी म्हणजे एमएल क्लास. या गाडीचे वैशिष्टय़ म्हणजे कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर ही गाडी पळू शकते. अतिशय दणकट आणि दिमाखदार अशी ही गाडी आहे. पहाडी प्रदेशातील खडकाळ रस्त्यावरही ही गाडी तुम्ही ड्राइव्ह करू शकता. गाडी चार इंच वर उचलण्याची सोयही या गाडीत आहे. किंमत ५५ लाखांच्या पुढे.