१. स्टीअिरग व्हील जाम वाटते. गाडी वळवताना जास्त शक्ती लावावी लागते आणि कार वळल्यावर स्टीअिरग मूळ जागी येत नाही. 

– सतीश खामकर, लोणी
स्टीअिरग हार्ड होण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे की, स्टीअिरग बॉक्समध्ये ऑइल कमी असणे किंवा संपले असणे, किंगपिनचे घर्षण होणे, पुढील टायरमधील हवा कमी असणे आणि चाकाचा अक्ष आणि उभा अक्ष यांच्यातला कोन (चेम्बर अँगल) जास्त असणे. अशी अडचण उद्भवल्यास स्टीअिरग बॉक्स तपासावा. व्हील अलाइनमेंट करून घ्यावे आणि असा प्रॉब्लेम झाल्यास स्टीअिरग बॉक्स चेक करावा, व्हील अलाइनमेंट करावे आणि चेम्बर अँकल नीट लावून घ्यावा. पुढील टायरमध्ये हवा योग्य प्रमाणात ठेवावी, जास्त किंवा कमी ठेवू नये. स्टीअिरग िलकेजेसला ग्रीसिंग करावे.

२. अँटिलॉक ब्रेकिंग सिस्टीम म्हणजे काय?
– रवी गायकवाड, नेरळ.
अँटिलॉक ब्रेकिंग सिस्टम ही प्रणाली संगणकीकृत असते. हायड्रॉलिक आणि इलेक्ट्रोमेकॅनिक उपप्रणाली प्रकार असतात. प्रत्येक चाकावर सेन्सर बसवलेला असतो तो चाकाचा वेग मुख्य भागाकडे (मास्टर सिलेंडर) पाठवतो. ब्रेक दाबल्यावर मास्टर सिलेंडर चाकाच्या वेगाप्रमाणे हायड्रॉलिक प्रेशर निर्माण करतो आणि ब्रेक लागतो. या सिस्टममुळे कमी अंतरात लवकर ब्रेक लागतो, वाहन स्लिप होत नाही. ही प्रणाली महाग असल्याने कारच्या किमतीत मोठा फरक पडू शकतो, पण सुरक्षेसाठी अँटिलॉक ब्रेक सिस्टम केव्हाही उपयुक्तच ठरते.

३. माझ्या कारची बॅटरी लवकर डिस्चार्ज होते.
– रजनीश इनामदार, सोलापूर
बॅटरीमध्ये एक आम्ल द्रावण असते. त्यामध्ये मेटल प्लेट्स असतात आणि त्यांची जोडणी धन किंवा ऋणसोबत असते. आम्ल द्रावणाची विशिष्ट ग्रॅव्हिटी कमी असेल, तर बॅटरी जास्त वेळ चार्ज राहत नाही. बॅटरी ओव्हरचार्ज झाल्यास आतील प्लेटला वाक येतो. त्यामुळे बॅटरीला धोका पोहोचतो तसेच आम्ल द्रावणाची पातळी कमी किंवा जास्त असणे, नोडवर कार्बन जमा होणे इत्यादी कारणे असू शकतात. म्हणून बॅटरीवरील कार्बन स्वच्छ करावा. द्रावणाची पातळी मेंटेन ठेवावी. ओव्हरफ्लो होऊ नये याची काळजी घ्यावी.

या सदरासाठी तुमचे प्रश्न bmayurm@gmail.com वर पाठवा.