* सर मी डॅटसन गो प्लस गाडी घेण्याचा विचार करतोय. माझ्या कुटुंबामध्ये सात सदस्य आहेत तरी या गाडीबद्दल मार्गदर्शन करा. माझे बजेट सात लाखांपर्यंत आहे.
– संदीप तिडके, औरंगाबाद
* डॅटसन गो प्लस ही गाडी नक्कीच चांगली आहे. मात्र, यात पाच मोठय़ा आणि दोन लहान अशाच व्यक्ती बसू शकतात. तसेच लगेज स्पेस काही उरत नाही. त्यापेक्षा तुम्ही शेवरोले एन्जॉय गाडी घ्यावी.
* होंडा सिटी आणि मारुती सुझुकी सिआझ यापकी कोणती गाडी घ्यावी याबद्दल मला संभ्रम आहे. माझे बजेट १० ते ११ लाख रुपये आहे. मला या बजेटमध्ये यापकी कोणती गाडी घेता येऊ शकेल.
– अशोक ढेंबरे
* तुम्ही स्वत: ही गाडी वापरणार असाल तर मारुती सिआझ ही गाडी घ्या. हिचा मेन्टेटन्स कमी आणि मायलेज चांगला आहे. तसेच या गाडीला रिसेल व्हॅल्यूही चांगली आहे. होंडा सिटी ही गाडी चांगली आहे, मायलेजही कमी आहे, मात्र हिचा मेन्टेनन्स जास्त आहे.
* माझे बजेट सहा लाख रुपये आहे. आमच्या घरात आम्ही पाच जण आहोत. माझे आठवडय़ाचे ड्रायिव्हग सुमारे ६० किमी आहे आणि मासिक ड्रायिव्हग ३०० किमी आहे. मी कोणती गाडी घ्यावी. वॅगन आर ही पाच जणांसाठी कम्फर्टेबल नाही आणि सीएनजी व्हर्जनमध्ये बूट स्पेस जास्त नाही. मी टाटा इंडिगोचा (सीएनजी व्हर्जन) विचार करतोय. सीएनजी वाहनांना जास्त मेन्टेनन्स लागते का, रिनगही कमी असते का त्यांचे.
– शैलेंद्र डावरे
* दरमहा ३०० किमी प्रवास हा सीएनजीसाठी फारसा किफायतशीर नाही. सीएनजी गाडय़ांना मेन्टेनन्स जास्त लागतो. त्यांना बूट स्पेस कमी असतो. या गाडय़ा जड असतात. मी तुम्हाला ह्युंडाई ग्रॅण्ड आय १० ही गाडी सुचवीन. ही एक चांगली गाडी आहे.
* माझे रोजचे अप-डाऊन ८० किमी आहे. माझी उंची १७५ सेंटिमीटर आहे. पेट्रोल वा डिझेल कोणती कार घेऊ. बूट स्पेस, मेन्टेनन्स, इंजिन क्षमता या बाबी विचारात घेऊन सुटेबल कार सुचवा.
– महेश बोरकर
* तुम्ही डिझेल कार घेणे योग्य ठरेल. तुमची उंची पाहता तुम्हाला मारुती रिट्झ एलडीआय ही गाडी सहा लाखांत घेता येऊ शकेल, परंतु निस्सानची मायक्रा ही उत्तम डिझेल १४९६ सीसी इंजिनची कार आहे. हिची पॉवर जास्त आहे. या दोन्ही गाडय़ा तुमच्या दृष्टीने उत्तम आहेत.